15 December 2017

News Flash

नव्या लूकसाठी शाहरुखने मानले गौरीचे आभार

ही तर एका प्रामाणिक पतीची लक्षणं...

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 15, 2017 1:35 PM

शाहरुख खान

गेल्या वर्षभरात बॉलिवूडचा किंग शाहरुख खान बऱ्याचदा त्याच्या कमांडो प्रिंटच्या पॅण्टमध्ये दिसला. विमानतळ, लहानमोठ्या मुलाखती, पत्रकार परिषद आणि अशा बऱ्याच ठिकाणी त्याचा एकच लूक पाहायला मिळत होता. त्यामुळे चाहत्यांमध्ये किंग खानच्या एकसारख्या लूकचीच चर्चा होती. तो नेमका नव्या लूकमध्ये कधी दिसणार हाच प्रश्न चाहत्यांना पडत असताना शेवटी किंग खानने त्याचा लूक बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या नव्या लूकचं सर्व श्रेयं जातंय गौरी खानला.

प्रामाणिक पतीप्रमाणे शाहरुखनेही पत्नीचा सल्ला ऐकत हा नवा लूक आपलासा केल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे, तर या ‘रईस’ अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन गौरीचे आभारही मानले आहेत. त्याने अब्रामसोबतचा एक फोटोही पोस्ट केला आहे. मुख्य म्हणजे गौरीच्या स्टाईल स्टेटमेंटवरुन शाहरुखने ही प्रेरणा घेतल्याचं लक्षात येत आहे.

कारण गौरीने तिच्या फोटोचं कोलाज पोस्ट केलं. ज्यामध्ये ती निळ्या रंगाची जिन्स आणि टी-शर्ट घातल्याचं पाहायला मिळत आहे. ‘ब्ल्यू जिन्स अॅण्ड टी- शर्ट, हा आहे माझा २०१७ चा लूक’ असं कॅप्शनही तिने दिलं आहे. गौरी आणि शाहरुखचे हे फोटो पाहता आता हे सेलिब्रिटी कपल स्टाईल स्टेटमेंटच्या बाबतीतही एकमेकांना प्रेरणा देत आहेत असं म्हणायला हरकत नाही. सध्या शाहरुख त्याच्या व्यस्त शेड्यूलमधून गौरी आणि अब्रामलाही वेळ देत आहे. काही दिवसांपूर्वीच हे दोघंही एका डिनर डेटवर गेले होते. किंग खानभोवती नेहमीच प्रसारमाध्यमं आणि छायाचित्रकारांचा गराडा असल्यामुळे त्याची ही डिनर डेटही चर्चेचा विषय ठरली होती.

Thx for the tip ma’m we r all set for 2017 too then. @gaurikhan

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk) on

Blue jeans and a t – shirt … my look for 2017.

A post shared by Gauri Khan (@gaurikhan) on

 

दरम्यान, किंग खान सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यस्त आहे. लवकरच तो अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित या चित्रपटामध्ये पुन्हा एकदा शाहरुख- अनुष्काची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.

वाचा : Fathers Day 2017 : मी ‘फादर्स डे’ वगैरे काही सेलिब्रेट करत नाही- ललित प्रभाकर

First Published on June 15, 2017 1:35 pm

Web Title: bollywood king actor shah rukh khan reveals his new look for 2017 and thanks gauri khan for this see photos