News Flash

“हा मूर्खपणा…,” ड्रग्ज प्रकरणी सेलिब्रेटींच्या चौकशीवरुन जावेद अख्तर संतापले

"फिल्म इंडस्ट्रीविरोधातील मोहीम कमी होताना दिसत नाही"

ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींची नावं पुढे येत असून एनसीबीकडून त्यांची चौकशी केली जात आहे. रकुलसोबत दीपिका, श्रद्धा कपूर आणि सारा खान यांची एनसीबीकडून सध्या चौकशी सुरु आहे. दरम्यान गीतकार आणि लेखऱ जावेद अख्तर यांनी बॉलिवूडची बाजू मांडली असून आरोग्याची इतकी काळजी घेणाऱ्या या सेलिब्रेटींनी ड्रग्जचं व्यसन आहे म्हणणं मूर्खपणा असल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना फिल्म इंडस्ट्रीविरोधातील मोहीम कमी होताना दिसत नाही अशी टीकाही त्यांनी केली आहे.

जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे की, “विषय बदलत चालले आहेत, पण फिल्म इंडस्ट्रीविरोधातील मोहीम कमी होताना दिसत नाही. जिथून विषय सुरु झाला होता तो सगळे विसरले. त्यानंतर आलेले विषयही विसरले, कारण त्यात सिद्ध करण्यासाठी काहीही सापडलं नाही. फिल्म इंडस्ट्रीत सगळे ड्रग्जचं व्यसन असणारी लोकं असल्याचं बोललं जात आहे. मी १९६५ पासून इंडस्ट्रीत आहे. आजची पिढी जितकी आरोग्याची काळजी घेतं तेवढं कोणीच नव्हतं”.

“जुने चित्रपट तुम्ही पाहिले तर हिरोईनचं वजन थोडं जास्त आहे, हिरोचं पोट पुढे आलं आहे. पण आजच्या मुला-मुलींना पाहिलं तर ते फिजिकली किती फिट आहेत. दिवसातले दोन ते तीन तास ते व्यायाम करत असतात. एकदम स्लीम, फिट, एकही फॅट जास्त नाही. हे तुम्हाला ड्रग्ज व्यसनी वाटतयात. जे ड्रग्ज घेतात त्यांना दुरुनही ओळखता येतं. ही आजकालची मुलं एवढी फिट आहेत की त्यांना ड्रग्जचं व्यसन आहे म्हणणं मूर्खपणाचं आहे,” असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2020 12:17 pm

Web Title: bollywood lyricist javed akhtar on drugs probe by ncb sgy 87
Next Stories
1 ‘या’ अभिनेत्याने ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत साइन केली १०० कोटींची डील?
2 Emmy Awards 2020 : ‘फोर मोर शॉट्स प्लीज’ आणि ‘दिल्ली क्राइम’ला सर्वोत्कृष्ट मालिकेचे नामांकन
3 देव आनंद यांना ‘ही’ अभिनेत्री करत होती नाव बदलून फोन
Just Now!
X