X
Advertisement

‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने यासाठी मानले चाहत्यांचे आभार

म्हणाली, मी आशा करते...!

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने नुकताच आपला ५४ वा वाढदिवस साजरा केला. वाढदिवसानिमित्तानं माधुरी दीक्षितच्या चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. पंरतू करोना काळात माधुरी दीक्षितला तिचा यंदाचा वाढदिवस साजरा करता आला नाही. तरीही तिने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत.

‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच फोटोज आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकतंच तिचा ५४ वा वाढदिवस झाल्यानंतर चाहत्यांचे आभार मानण्यासाठी तिने एक व्हिडीओ शेअर केलाय. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिने हा व्हिडीओ शेअर केलाय. यात माधुरी दीक्षित म्हणतेय, “नमस्कार, मी आशा करते की तुम्ही सर्व जण सुरक्षित असाल…मला माझ्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.” या व्हिडीओमध्ये बोलताना माधुरी दीक्षितने तिच्या चाहत्यांना घरी राहण्याचं आवाहन देखील केलंय. यापुढे ती म्हणते, “तुमच्याकडून मिळत असलेल्या शुभेच्छा मला नेहमीच स्पेशल असल्याची जाणीव करून देतात…मला माहितेय, सध्या आपण सर्व जण खूप कठिण काळातून जातोय. मी तुम्हा सर्वाना विनंती करते की आपल्या नातेवाईकांशी जुळलेले रहा, घरी रहा, सुरक्षित रहा, मास्क लावा, करोना लस घ्या आणि करोना नियमांचं पालन करा. सध्या आपण सर्व एकत्र राहण्याची गरज आहे आणि मोठ्या हिंमतीने याचा सामना करावा लागणार आहे. खूप खूप आभार.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरी दीक्षितने शेअर केलेल्या या व्हिडीओला तिच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिलीय. या व्हिडीओवर कमेंट्स करत तिच्या चाहत्यांनी तिचं कौतूक केलं आहे. माधुरी दीक्षितच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गेल्या वर्षी तिचा ‘कलंक’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात आलिया भट्ट, वरुण धवन, आदित्य रॉय कपूर, सोनाक्षी सिन्हा, कुणाल खेमू आणि संजय दत्त यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. परंतू तरीही हा चित्रपट फ्लॉप ठरला. सध्या माधुरी दीक्षित लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘डान्स दिवाने ३’ मध्ये परिक्षण करतेय.

22
READ IN APP
X