News Flash

प्रतिक्षा संपली!,’फॅमिली मॅन-2′ लवकरच येणार भेटीला

'द फॅमिली मॅन-2'चं शूटिंग पूर्ण

अभिनेता मनोज वाजपेयीच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजने 2019 सालात धुमाकूळ घातला होता. या या वेब सीरिजने चाहत्यांची चांगलीच पसंती मिळाली होती. त्यानंतर चाहत्यांमध्ये या वेब सीरिजच्या दुसऱ्या भागासाठी उत्सुकता निर्माण झाली. ‘द फॅमिली मॅन’ च्या दुसऱ्या भागाची घोषणादेखील करण्यात आली होती. मात्र करोना आणि लॉकडाउनच्या परिस्थितीमुळे या वेब सीरिजच्या प्रक्षेपणाची तारीख जाहीर केली जात नव्हती. मात्र अखरे प्रेक्षकांची प्रतिक्षा आता संपणार आहे.

‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजचा दुसऱा भाग मे महिन्यात रिलीज होणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. वेब सीरिजच्या प्रेक्षपणाची तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वेब सीरिज रिलीज होईल असं म्हंटलं जातंय.

‘द फॅमिली मॅन-2’ च्या निर्मात्य़ांनी जानेवारी महिन्य़ात सुरु झालेल्या ‘तांडव’ सीरिजच्या वादानंतर ‘द फॅमिली मॅन-2’ चं प्रक्षेपण पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय़. या वेब सीरिजच्या काही दृश्यांचं शूटिंगदेखील बाकी होतं. मात्र आता या वेब सीरिजचं शूटिंग पूर्ण झालं असून लवकरच ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अद्याप या वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज करण्यात आलेला नाही. मात्र पहिल्या भागानंतर आता प्रेक्षकांमध्ये ‘द फॅमिली मॅन-2’ साठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by amazon prime video IN (@primevideoin)

या सीरिजमध्ये मनोज वाजपेयीसोबत समंथा अक्किनेनी, प्रियामणि, शारिब हाशमी, सीमा बिस्वा, दर्शन कुमार, शरद केळकर, सनी हिंदुजा, श्रेया धन्वंतरी, शहाब अली, वेदांत सिन्हा आणि महक ठाकूर हे महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 9:27 am

Web Title: bollywood manoj bajpayee the family man 2 series expected release in may kpw 89
Next Stories
1 अमेरिकेतल्या लोकांना राष्ट्राध्यक्ष म्हणून हवाय ‘द रॉक’, त्यावर तो म्हणतो,” मला नाही वाटत….”
2 “तेव्हा माझं घर म्हणजे बगीचा झाला होता”- प्रियांका चोप्रा
3 अक्षय कुमार आणि लिओनार्दो दि कॅप्रिओ यांना पुरस्कार जाहीर; पर्यावरण संवर्धनासंदर्भातील कामाचा सन्मान
Just Now!
X