News Flash

मेसेंजरपासून सुरु झालेल्या रिलेशनशिपमध्ये बॉलिवूड अभिनेत्रीला गवसलं तिचं अस्तित्वं

विमानप्रवासादरम्यान त्यांच्या गप्पा रंगल्या आणि या प्रवासाच्या शेवटी ते एकमेकांचे खूपच चांगले मित्र झाले होते.

छाया सौजन्य- सोशल मीडिया

कोणाचीही प्रेमकहाणी ऐकत असताना अनेकांच्या कुतूहलपूर्ण नजरा पाहून बऱ्याचदा त्या वातावरणात वेगळीच सकारात्मकता अनुभवायला मिळते. अभिनेत्री श्वेता त्रिपाठीची प्रेमकहाणीसुद्धा अशीच काहीशी आहे. मनाचा ठाव घेणारी, परिकथेचा लवलेशही नसणारी पण, तरीही आपलीशी वाटणारी. ‘ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या फेसबुक पेजवरुन श्वेताची प्रेमकहाणी पोस्ट करण्यात आली आहे. खुद्द श्वेतानेच तिच्या आयुष्यातील एका खास नात्याविषयीच्या बऱ्याच गोष्टींचा उलगडा केला आहे.

एका नाटकामध्ये श्वेता आणि ‘तो’ म्हणजेच तिचा प्रियकर रॅपर चैतन्य शर्मा हे दोघंही काम करत होते. त्या नाटकाच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. विमानप्रवासादरम्यान त्यांच्या गप्पा रंगल्या आणि या प्रवासाच्या शेवटी ते एकमेकांचे खूपच चांगले मित्र झाले होते.

श्वेता आणि तिच्या आयुष्यात आलेल्या त्या खास व्यक्तीचं नातं दिवसेंदिवस आणखी दृढ होत होतं. मेसेंजरपासून सुरु झालेला त्यांचा हा सुरेख प्रवास कधी रिलेशनशिपच्या टप्प्यावर येऊन पोहोचला हे त्यांचं त्यांनाच कळलं नाही. श्वेताचा वेडेपणा, खोडकरपणा या सर्व गोष्टी त्यांच्या मनाचा ठाव घेत होत्या. अॅम्युझमेंट पार्कमध्ये श्वेताला प्रपोज करणाऱ्या तिच्या प्रियकराने कधीच तिच्या स्वभावाविषयी खंत व्यक्त केली नाही. आज त्यांच्या नात्याने पाच वर्षे ओलांडली असून, आपल्या स्वभावासह आपला स्वीकार करणाऱ्या या एका व्यक्तीसाठी श्वेता नेहमीच आपण कृतज्ञ असल्याचं म्हणते.

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

‘मसान’ फेम श्वेताने या पोस्टच्या माध्यमातून आपल्या आयुष्यातील त्या खास व्यक्तीविषयी बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यासोबत असतानाच मला माझं खरं अस्तित्व गवसतं असंही ती न विसरता म्हणाली. श्वेता त्रिपाठी ही दिल्लीचे माजी मुख्य सचिव पीके त्रिपाठी यांची कन्या आहे. ‘मसान’, ‘हरामखोर’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने भूमिका साकारली आहे. त्याचबरोबर ‘क्या मस्त है लाइफ’ या मालिकेतही ती झळकली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2018 4:45 pm

Web Title: bollywood masaan fame actress shweta tripathi love story humans of bombay
Next Stories
1 सुनिधी चौहानने अनोख्या पद्धतीने शेअर केला मुलाचा फोटो
2 ‘राजी’ची घोडदौड १०० कोटींच्या घरात, केली ‘या’ विक्रमांची नोंद
3 हॉस्टेलमध्ये बायकोचे पोस्टर लावायचा अर्जुन रामपाल, अशी होती त्यांची लव्हस्टोरी
Just Now!
X