News Flash

लॉकडाउनमध्ये या अभिनेत्रीला बेरोजगारीमुळे विकावे लागले अवॉर्ड्स ; चिरंजीवीनी दिला मदतीचा हात

१ लाख रूपयांची केली मदत

करोना महामारीमुळे प्रत्येक स्तरातील व्यक्तींना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतोय. या महामारीमुळे एकीकडे हजारो लोकांचे जीव जात आहेत, तर दुसरीकडे अनेक लोकांना आर्थिक फटका बसला असून दोन वेळच्या जेवणाची सोय करणं अवघड होऊन बसलंय. कित्येक लोकांनी तर आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. यात फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे कलाकार आणि वर्कर्सचा देखील समावेश आहे.

साउथ सिनेमातील प्रसिद्ध आणि वरिष्ठ अभिनेत्री पावला श्यामला या देखील आर्थिक अडचणीशी सामना करत आहेत. यामुळे त्यांच्यावर येणाऱ्या प्रत्येक दिवस कसाबसा काढण्याची वेळ आली आहे. इतकंच नव्हे तर ७० वर्षीय पावला श्यामला यांना त्यांच्या मुलीच्या उपचारासाठी प्रत्येक महिन्याला १० रूपये खर्च करावे लागत आहेत. हातात काम नसल्यामुळे त्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत आणि येणारा खर्च कसा भागवायचा, हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.

“मी माझे अवॉर्ड सुद्धा विकले….”
साउथ अभिनेत्री पावला श्यामला म्हणाल्या, “गरिबी तर मी आधीपासून पाहिली आहे, पण अशी परिस्थिती मी पहिल्यांदा पाहतेय…आता या गरिबीची भिती वाटू लागली आहे. मुलीला तिच्या पायावर जखम झाली आहे. सोबत तिला टीबी देखील झालाय. तिच्यासाठी प्रत्येक महिन्याला १० हजार रूपये खर्च करावे लागतात. ही गरज भागवण्यासाठी मी यापूर्वी अनेकदा तर मला मिळालेले अवॉर्ड्स देखील विकले आहेत. करोना काळात माझ्या मदतीसाठी कुणीच पुढे येत नाही. या काळात ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन देखील मिळत नाही.”

अशा परिस्थितीत त्यांच्या मदतीसाठी आता साउथ सुपरस्टार चिंरजीवी पुढे सरसावले आहेत. त्यांनी पावला श्यामला यांना 1,01,500 रुपये देऊन त्यांची आर्थिक मदत केली आहे. सुपरस्टार चिंरजीवी यांचे प्रवक्ते सुरेश कोंडेती यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर सुपरस्टार चिंरजीवी यांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये चिरंजीवी स्वतः त्यांच्या हाताने पावला श्यामला यांना 1,01,500 रुपयांचा चेक देताना दिसून येत आहेत.

सुरेश कोंडेती यांनी हे फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केले आहेत. हे फोटोज शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय, “मेगास्टार चिरंजीवी गुरूंनी दिग्गज अभिनेत्री पावला श्यामला यांना 1,01,500 रुपयांचा चेक देऊन आर्थिक मदत केली आहे. दिग्गज अभिनेत्री पावला श्यामला या सध्या आपलं घर चालवण्यासाठी संघर्ष करीत आहेत…”

सोशल मीडियावर सध्या हे ट्विट अगदी वाऱ्यासारखं पसरलं आहे. मेगास्टार चिरंजीवी आणि अभिनेत्री पावला श्यामला यांच्या फॅन्सनी या ट्विटला लाइक आणि कमेंट करत मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे. सोबतच मेगास्टार चिंरजीवी यांचं देखील फॅन्सनी भरभरून कौतूक केलं आहे. इतकंच नव्हे तर चिरंजीवी यांनी अभिनेत्री पावला श्यामला यांचं नाव मूवी आर्टिस्ट्स एसोसिएशन (एमएए) मध्ये नोंदवलं आहे. त्यामुळे आता त्यांना प्रत्येक महिन्याला ६००० रूपयांची पेन्शन देखील मिळणार आहे.

दिग्गज अभिनेत्री पावला श्यामला यांनी आतापर्यंत २५० पेक्षा जास्त चित्रपटात काम करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री पावला श्यामला या बहूतकरून विनोदी चित्रपटांमध्ये झळकल्या आहेत. त्यांना उत्तम कॉमिक टाइमिंगसाठी ओळखलं जातं. पावला श्यामला यांनी जवळजवळ साउथमधल्या सर्वच बड्या कलाकारांसोबत काम केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 9:41 pm

Web Title: bollywood megastar chiranjeevi has donated rs 1 lakh actress pavala syamala after she sought financial aid also made arrangements so that from now on she gets a monthly pension prp 93
Next Stories
1 तौक्ते : चक्रीवादळात उडाला सलमान खानच्या ‘टायगर ३’ चा सेट ; मेकर्सचं नुकसान
2 “जर तुम्ही श्रीमंत आहात तर गरीबांकडे भीक मागू नका.”; कंगना रणौतचा ‘त्या’ सेलिब्रिटींना टोला
3 सलमानच्या ‘राधे’ची पायरेटेड कॉपी सोशल मीडियावर ; 3 जणांवर गुन्हा दाखल
Just Now!
X