29 October 2020

News Flash

मद्याच्या अधीन गेल्यानंतर आलोक नाथांचं वेगळं रुप समोर येतं – रेणुका शहाणे

रेणूका आणि आलोक यांची वडील- मुलीची जोडी रुपेरी पडद्यावर हिट ठरली.

बॉलिवूडचे ‘संस्कारी बापुजी’ अशी ओळख असलेल्या आलोक नाथ यांच्यावर आतापर्यंत चार महिलांनी लैंगिक गैरवर्तणुकीसह अनेक गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांनंतर त्यांच्यासोबत काम केलेली अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी मात्र एक वेगळाच अनुभव सांगितला आहे. रेणुका आणि आलोक यांची वडील- मुलीची जोडी रुपेरी पडद्यावर हिट ठरली.

आलोक नाथ यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर रेणूका एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून व्यक्त झाल्या आहेत. ‘मद्याच्या अधीन गेल्यानंतर आलोक नाथांचं वेगळं रुप समोर येतं. आलोक नाथ यांच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव चांगला होता. पण आलोक नाथ यांचे दोन चेहरे आहेत. मद्यपान केल्यानंतर त्याचं वेगळंच रुप समोर येतं असं मी अनेक कलाकारांकडून ऐकलं होतं. आलोक नाथ यांच्यासोबत मी ‘हम आपके है कौन’ या चित्रपटातून आणि ‘इम्तिहान’ या मालिकेत काम केलं. पण या दोन्हींचं चित्रीकरण संपल्यानंतर मला त्यांच्या गैरवर्तणुकीचे अनेक किस्से ऐकायला मिळाले. आलोक यांनी एका अभिनेत्रीसोबत पार्टीतही गैरवर्तन केल्याचं मी ऐकलं होतं. त्यांनी नक्कीच बऱ्याच अभिनेत्रींसोबत गैरवर्तन केलं असणार पण, त्या याविषयी बोलायला घाबरत असलीत’ असंही रेणुका या मुलाखतीत म्हणाल्या.

२० वर्षांपूर्वी आलोक नाथ यांनी माझ्यावर बलात्कार केला असा धक्कादायक आरोप निर्मात्या- दिग्दर्शिक विनता नंदा यांनी केला होता. त्यानंतर संध्या मृदुल, दीपिका अमीन हिनं देखील लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप त्यांच्यावर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 2:21 pm

Web Title: bollywood metoo renuka shahane on alok nath
Next Stories
1 #MeToo : आलोक नाथ स्त्रीलंपट, आणखी एका अभिनेत्रीचा आरोप
2 लवकरच ‘या’ नाटकात झळकणार सुशांत-अस्तादची जोडी
3 #MeToo : महिला कॉमेडिअनचं बळजबरीने चुंबन घेतल्याबद्दल अदिती मित्तलने मागितली माफी
Just Now!
X