News Flash

Happy Mothers day 2020 : बिग बींपासून ते सारा अली खानपर्यंत सेलिब्रिटींनी असा साजरा केला ‘मदर्स डे’

सेलिब्रिटींनी व्यक्त केल्या आईप्रतीच्या भावना

‘आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही’, असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. आई आहे म्हणून प्रत्येकाच्या घराला घरपण आहे. सतत घरातल्यांसाठी, मुलांसाठी राबणारी आई एकही दिवस सुट्टी न घेतला ३६५ दिवस काम करत असते. कधी दुखलंखुपलं तरीदेखील कोणाला न सांगता ते सहन करते. अशाच आईचा सन्मान करणारा,तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो. त्यामुळे हा दिवस प्रत्येक मुलासाठी, मुलीसाठी खास असतो. यामध्येच काही बॉलिवूड कलाकारांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आईला खास शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता विकी कौशलने इन्स्टाग्रामवर त्याच्या लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो त्याच्या आईसोबत समुद्र किनारी मस्ती करताना दिसत आहे. आज सुद्धा मी असाच पळत असतो, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

Dodging them till date. Keep them coming Maa. Love you!

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

अभिनेत्री अनन्या पांडेने तिच्या लहानपणीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात अनन्याचे वडील अभिनेता चंकी पांडे तिला विचारतात की जगात तू सगळ्यात जास्त प्रेम कोणावर करते, तर त्यावर ती पटकन आईचं नाव घेते.

सोशल मीडियावर बिनधास्तपणे व्यक्त होणारी अभिनेत्री ट्विंकल खन्नाने एक मोनोलॉग शेअर केला असून यात एका आईला मुलांकडून काही अपेक्षा असतात पण ती सांगू शकत नाही. यावेळी तिची नेमकी अवस्था काय असते हे ट्विंकलने मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

 

View this post on Instagram

 

And what kind of mom are you — The bad mom, the badass mom or the badass mom with a good posterior? Mother’s Day with @tweakindia

A post shared by Twinkle Khanna (@twinklerkhanna) on

 

View this post on Instagram

 

Meri Maa ki Maa Thank you for creating Mommy #HappyMothersDay

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

सारा अली खानने आई अमृता सिंग आणि आजीचा एक फोटो शेअर केला आहे.

अमिताभ बच्चन यांनीही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन एक छान संदेश दिला आहे.

तसंच अभिनेत्री कंगना रणौतने आईसाठी एक कविता लिहिली आहे.

 

View this post on Instagram

 

Mama I love you. Miss you so so so much.. I can’t wait to see you and hug you tight. Happy Mother’s Day.. @kapoor.sunita

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor) on

दरम्यान, अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अर्जुन रामपाल, सोनम कपूर,अर्पिता खान या कलाकारांसोबत अन्य अनेक सेलिब्रिटींनी या दिवशी आपल्या आईला विशेष शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळत आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2020 9:11 am

Web Title: bollywood mothers day 2020 bollywood celebrities share heartfelt wishes for their moms ssj 93
टॅग : Mothers Day
Next Stories
1 भारतातील लोक ‘या’ अभिनेत्रीला दररोज करतात सर्च
2 “लॉकडाउन त्वरीत उठवा”; अभिनेत्याची सरकारकडे मागणी
3 रामायणात लक्ष्मण साकारणाऱ्या सुनील लहरींचा मुलगा बनला ‘नॅशनल क्रश’
Just Now!
X