19 April 2019

News Flash

Badhaai Ho Official Trailer: आयुषमान म्हणतोय, ‘मेरी मम्मी के बेबी शॉवर में जरुर आना’

आपल्या आईच्याच बेबी शॉवरला सर्वांना बोलवणारा आयुषमान बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरणार का?

बधाई हो

अभिनेता आयुषमान खुराना आणि ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या ‘बधाई हो’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. जंगली पिक्चर्सची निर्मिती असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर अवघ्या काही क्षणांतच सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. खळखळून हसवणाऱ्या या चित्रपटातील कलाकार, त्यांचा अफलातून अभिनय आणि एकंदर पार्श्वसंगीताची मिळालेली जोड या ट्रेलरचा खास टच देत आहे.

अमित शर्मा दिग्दर्शित या चित्रपटातून आपल्या आईच्या गरोदरपणामुळे तरुण मुलाला नेमका कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्यातूनच मग कुटुंबात कशा प्रकारे विचित्र प्रसंग उदभवतात याचं विनोदी चित्रण या चित्रपटात करण्यात आल्याचं कळत आहे.

वाचा : Section 377 verdict : ‘अखेर देशाने आम्हाला स्वीकारलं’

चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये झळकणारे कलाकार पाहता हा चित्रपट खऱ्या अर्थाने मल्टीस्टारर असून, प्रत्येक कलाकाराच्या अभिनयामुळे तो प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरतो का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नीना गुप्ता या चित्रपटातून आयुषमान खुरानाच्या आईच्या भूमिकेत झळकत आहेत. त्यामुळे आता आपल्या आईच्याच बेबी शॉवरला सर्वांना बोलवणारा आयुषमान बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे,

 

First Published on September 11, 2018 12:59 pm

Web Title: bollywood movie badhaai ho official trailer ayushmann khurrana sanya malhotra director amit sharma