27 January 2021

News Flash

कारागृहातून सुटका होऊनही झायराशी असभ्य वर्तन करणाऱ्याच्या मनात वेगळीच भीती

दिल्ली ते मुंबई विमान प्रवासादरम्यान ‘दंगल गर्ल’ झायराशी त्याने असभ्य वर्तन केले होते

झायरा वसिम

‘दंगल’ चित्रपटामुळे प्रकाशझोतात आलेल्या झायरा वसिमसोबत विमानप्रवासादरम्यान गैरवर्तन करणाऱ्या विकास सचदेवा या व्यक्तीला नुकताच जामीन मिळाला. आपल्या पतीला पोलिस कोठडीतून सोडल्यानंतर विकासच्या पत्नीने म्हणजे दिव्या सचदेवाने सुटकेचा नि:श्वास सोडला. असे असले तरीही सध्या मात्र सचदेवा आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला एक वेगळीच भीती लागून राहिली आहे.

‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार झायराशी गैरवर्तन केल्याप्रकरणीच्या खटल्याची पुढील सुनावणी २ जानेवारी २०१८ ला होणार आहे. सचदेवाचे भविष्य याच सुनावणीमध्ये ठरणार असल्यामुळे आता त्याकडेच त्याचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे लक्ष लागून राहिले आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडेच लक्ष लागून राहिलेल्या सचदेवाच्या मनात एक प्रकारच्या भीतीने घर केल्याची माहितीही सुत्रांनी दिली.

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

दिल्ली ते मुंबई विमान प्रवासादरम्यान ‘दंगल गर्ल’ झायरा वसिम हिच्याशी असभ्य वर्तन करणाच्या आरोपाखाली विकास सचदेवावर भारतीय दंडसंविधानाच्या ‘पोस्को’ (Protection of Children from Sexual Offences Act) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत त्याच्यावर कारवाई सुरु असतानाच त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2017 6:19 pm

Web Title: bollywood movie dangal fame actress zaira wasims alleged molester is still having sleepless nights
Next Stories
1 अंडरवर्ल्डच्या दहशतीपुढे सेन्सॉरने गुडघे टेकले, करणी सेनेचा आरोप
2 व्होट बँकेच्या राजकारणामुळे ‘पद्मावती’ला डावलले; पहलाज निहलानींचा सेन्सॉर बोर्डावर आरोप
3 Year End 2017 Special : ‘या’ वेब सीरिजने गाजवले २०१७
Just Now!
X