28 February 2021

News Flash

Dhadak : इशानही म्हणतो ‘आर्ची- परश्या’च सरस

इशान खट्टर आणि जान्हवी कपूर हे दोन्ही स्टारकिड सध्या कलाविश्वात बरेच चर्चेत आहेत.

इशान खट्टर, ishaan k

इशान खट्टर आणि जान्हवी कपूर हे दोन्ही उगवते कलाकार सध्या कलाविश्वात बरेच चर्चेत आहेत. शशांक खैतान दिग्दर्शित धडक या चित्रपटातून हे दोन्ही कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत यशाच्या आणि लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर पोहोचलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक असणाऱ्या ‘धडक’ या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला. ज्यानंतर त्याची तुलना ‘सैराट’शी करण्यास सुरुवात झाली.

रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांनी साकरलेली आर्ची आणि परश्ची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कशा प्रकारे एक वेगळं स्थान मिळवून आहे, हेच यावरुन सिद्ध झालं. खुद्द इशाननेही या दोन्ही मराठमोळ्या कलाकारांची प्रशंसा केली आहे. ‘झिंगाट’ या गाण्याच्या हिंदूी व्हर्जनच्या अनावरणाच्या निमित्ताने एका रेडिओ केंद्रात इशान आणि जान्हवीने हजेरी लावली होती. त्याचवेळी त्याने हे वक्तव्य केलं. ‘आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु या दोन्ही कलाकारांनी सैराटमध्ये अप्रतिम काम केलं होतं’, असं तो म्हणाला.

वाचा : जेव्हा कारागृहात संजयला करावी लागली होती मजुरी…

त्याशिवाय त्याने ‘झिंगाट’ या गाण्याविषयीसुद्धा आपलं मत मांडलं. मुळात या गाण्याच्या मराठी आणि हिंदी अशा दोन्ही व्हर्जनमध्ये होणाऱ्या तुलनेविषयी सांगत इशान म्हणाला, या गाण्याच्या कोणत्याही व्हर्जनला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. देशाच्या कोणत्याही कोपऱ्यातील कोणतीही व्यक्ती या गाण्याच्या तालावर थिरकू शकते असं म्हणत इशानने त्याचं ‘झिंगाट’ प्रेम व्यक्त केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 9:36 am

Web Title: bollywood movie dhadak actor ishaan khatter says akash thosar and rinku rajguru did an amazing job in sairat
Next Stories
1 Sanju Movie Review Live Updates: व्यक्ती एक, रुपं अनेक…’संजू’
2 जेव्हा कारागृहात संजयला करावी लागली होती मजुरी…
3 …म्हणून आईच्या निधनानंतर ३ वर्षांनी संजय दत्तच्या भावनांचा बांध फुटला
Just Now!
X