22 October 2020

News Flash

मी काही न बोल्लेलच बरं, असं का म्हणतेय जान्हवी?

आता येत्या काळात जान्हवी तिच्या या निर्णयावर ठाम राहणार की या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन बदलणार?

जान्हवी कपूर, Janhvi Kapoor

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर हे नवे चेहरे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत. माध्यमांच्या प्रतिनिधींनासुद्धा ही नवोदित जोडी मुलाखती देत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण, या साऱ्यामध्ये जान्हवी काही गोष्टींच्या बाबतीत बरीच सावधगिरी बाळगताना दिसत आहे.

उत्साहाच्या भरात आपण काही बोलून गेल्यानंतर माध्यमांमध्ये त्याचा चुकीने अर्थ काढण्यात आल्यामुळेच जान्हवीने त्या बाबतीत सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली आहे. किंबहुना ही एक गोष्ट आपण शिकल्याचं तिने अनुपमा चोप्रा यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं. मुलाखतींमध्ये कोणत्याही गोष्टीवर वक्तव्य केल्यानंतर त्या गोष्टी जेव्हा इतरांपर्यंत पोहोचवल्या जातात तेव्हा, त्या वेगळ्याच दृष्टीकोनातून मांडलेल्या असतात. त्यामुळेच आपण काही गोष्टींच्या बाबतीत दक्षता बाळगत असल्याचं तिने या मुलाखतीत स्पष्ट केलं.

चाचा- चाचींना सलाम: १३ हजार फुटांवर जवळपास ४५ वर्षे चालवतायेत ढाबा

‘फिल्म कंपॅनियन’ या युट्यूब चॅनलवरुन जान्हवीची ही मुलाखत पोस्ट करण्यात आली आहे. त्यामुळे आता येत्या काळात जान्हवी तिच्या या निर्णयावर ठाम राहणार की या सर्व गोष्टींकडे पाहण्याचा तिचा दृष्टीकोन बदलणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 5:55 pm

Web Title: bollywood movie dhadak actress janhvi kapoor on being misquoted in media watch video
Next Stories
1 स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावर शूट होणारा पहिला मराठी चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला
2 BLOG : नवे चेहरे, हवे हवे…
3 मायलेकीच्या नात्यावर हळूवार फुंकर घालणार ‘गूज’
Just Now!
X