21 October 2020

News Flash

हा आहे जान्हवी कपूरचा ‘डाएट प्लॅन’

अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी येत्या काळात 'धडक' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जान्हवी कपूर, Janhvi Kapoor

हिंदी चित्रपटसृष्टीत आता काही प्रसिद्ध सेलिब्रिटींची मुलंसुद्धा पदार्पणासाठी सज्ज झाली आहेत. येत्या काळात बरेच नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्याच चेहऱ्यांमधील एक नाव म्हणजे जान्हवी कपूर. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी येत्या काळात ‘धडक’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शशांक खैतान दिग्दर्शित या चित्रपटातून ती इशान खट्टरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने जान्हवी बरीच चर्चेत असून, ती गेल्या बऱ्याच काळापासून सोशल मीडियावरही अनेकांचं लक्ष वेधत आहे. अशा या स्टारकिडने सुरुवातीपासूनच काही गोष्टींवर काटेकोरपणे लक्ष देत काही चांगल्या सवयी अंगी बाणवल्या आहेत. जान्हवीविषयीच्या चर्चेत असणाऱ्या अशाच काही गोष्टींमधील कुतूहलाचा एक विषय म्हणजे तिचं डाएट. शारीरिक सुदृढतेसाठी डाएट महत्त्वाचा असतो, असा जर तुमचा समज असेल तर जान्हवी तुमच्या या मताशी सहमत होणाऱ्यांपैकी नसल्याचं कळत आहे.

‘टाइम्स न्यूज’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अमुक एका पद्धतीच्या डाएट प्लॅनला प्राधान्य न देता खाण्याच्या सवयींमध्ये योग्य तो समतोल राखण्याला तिने प्राधान्य दिलं आहे. जंक फूड आणि गोडाच्या पदार्थांपासून ती शक्यतो दूर राहते. सोशल मीडियावर सुरु असणाऱ्या चर्चांनुसार, जान्हवीच्या ब्रेकफास्टमध्ये एक ग्लास ज्यूस, टोस्ट आणि अंड्याच्या पांढऱ्या भागाचा समावेश असतो. त्याशिवाय ती ब्रेकफास्टमध्ये दूधही घेते.

दुपारच्या जेवणामध्ये ती सहसा घरगुती पदार्थांनाच प्राधान्य देत असल्याचं कळत आहे. ज्यामध्ये ब्राऊन राईस, सँडविच, सॅलड, चिकन अशा पदार्थांना प्राधान्य देते. व्यग्र वेळापत्रकामध्ये दुपारच्या जेवणासाठी ती फळं आणि ज्यूसला प्राधान्य देते. रात्री झोपण्यापूर्वी तीन तासांपूर्वी जान्हवी जेवून घेते. सहसा तिच्या रात्रीच्या जेवणामध्ये सूप, डाळी, उकडलेल्या भाज्या, सॅलड किंवा ग्रील्ड पदार्थांचा समावेश असतो.

Wimbledon 2018 VIDEO : पाहा, विम्बल्डन जिंकलेल्या बाबाची कहाणी…

जेवणामध्ये समतोल राखण्यासोबतच जान्हवी व्यायामालाही तितकच प्राधान्य देते. आपल्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत ती नेहमीच ठरलेल्या वेळाच व्यायाम करते. वेळ मिळत नसल्यास ती जॉगिंग, स्विमिंगही करते. जान्हवी आतापासून घेत असलेली मेहनत आणि कारकिर्दीत सुरु झालेली तिची वाटचाल सध्या बरीच प्रशंसनीय ठरत ाहे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2018 3:40 pm

Web Title: bollywood movie dhadak actress janhvi kapoors diet and fitness secrets revealed
Next Stories
1 Bigg Boss Marathi : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात रंगणार ‘मस्ती की पाठशाला’!
2 photos : ‘या’ शहरात होणार कतरिनाचं बर्थडे सेलिब्रेशन
3 Bigg Boss Marathi : रेशमला ही चूक पडली महागात?
Just Now!
X