News Flash

Video : ‘धडक है ना’वर थिरकले इशान-जान्हवी

बॉलिवूड वर्तुळात सध्या या जोडीच्या केमिस्ट्रीविषयी बऱ्याच चर्चा सुरु असून, त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीविषयीसुद्धा काही विषयांना हवा मिळत आहे.

dhadak movie, जान्हवी कपूर, इशान खट्टर,

Dhadak Movie. कलावर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे ती म्हणजे शशांक खैतान दिग्दर्शित धडक या चित्रपटाची. दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि शाहिद कपूरचा भाऊ इशान खट्टर या चित्रपटाच्या निमित्ताने स्क्रीन शेअर करत आहेत. जान्हवी या चित्रपटातून अभिनय विश्वात पदार्पण करत असून, या चित्रपटाच्या प्रसिद्धीलाही तिने मोठ्या उत्साहात सुरुवात केली आहे.

चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी जान्हवी आणि इशानने नुकतीच जयपूर मधील एका शॉपिंग मॉलमधील कार्यक्रमात हजेरी लावली. ज्यावेळी त्यांनी धडकच्या शीर्षक गीतावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी गायलेल्या या गाण्यावर इशान आणि जान्हवीची सुरेख अशी केमिस्ट्री पाहण्याची संधी मिळाली. जेथे त्यांनी अनेकांच्याच काळजाता ठोका चुकवला.

वाचा : Alia Bhatt-Ranbir Kapoor: आलिया- रणबीरच्या रिलेशनशिपविषयी काय म्हणाली पूजा भट्ट?

बॉलिवूड वर्तुळात सध्या या जोडीच्या केमिस्ट्रीविषयी बऱ्याच चर्चा सुरु असून, त्यांच्या ऑफस्क्रीन केमिस्ट्रीविषयीसुद्धा काही विषयांना हवा मिळत आहे. अमिताभ भट्टाचार्य याने लिहिलेल्या या गाण्यात जान्हवी आणि इशानची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची संधी मिळत आहे. गाण्याचे शब्द आणि त्याची चाल या साऱ्या घडी इतकी सुरेख बसली आहे, की या ‘धडक है ना’मुळे चाहत्यांच्याही काळजाचा ठोका चुकत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2018 2:36 pm

Web Title: bollywood movie dhadak fame actress janhvi kapoor and co star ishaan khattar danced in launch event of dhadak title track watch video
Next Stories
1 Bigg Boss Marathi : ‘हुकूमशहा’ नंदकिशोरविरोधात प्रजा पुकारणार बंड
2 ऐकावं ते नवलच! रजनीकांत यांच्या नावाचा असाही वापर
3 हस्तमैथुनाच्या दृश्यामुळे मी लोकांच्या हाती आयतं कोलीत दिलं- स्वरा भास्कर
Just Now!
X