बऱ्याच चर्चा आणि कलाकारांच्या प्रशंसेनंतर जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘धडक’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. स्टारकिड्स, घराणेशाही या मुद्द्यावरुन आणि ‘सैराट’शी होणारी तुलना पाहता या चित्रपटाची सुरुवातीपासूनच बरीच चर्चा होती. या चित्रपटाच्या निमित्ताने दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर हिने अभिनय विश्वात पदार्पण केलं.

शशांक खैतान दिग्दर्शित ‘धडक’ या चित्रपटासाठी फक्त जान्हवीच नव्हे, तर इशानच्याही अभिनयाचीही प्रशंसा कलाविश्वातून झाल्याचं पाहायला मिळालं. पण, सोशल मीडियावर मात्र त्यांचा हा चित्रपट चुकीच्या पद्धतीने धडकल्याचं स्पष्ट होत आहे. एकिकडे या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईकडे सर्वांचच लक्ष लागून राहिलेलं असताना दुसरीकडे सोशल मीडियावर त्याविषयीचे विनोदी मीम व्हायरल होत आहेत.

The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Amitabh Bachchan stopped talking to Jaya Bachchan
दोन दिवस जया बच्चन व मुलांशी बोलले नव्हते अमिताभ बच्चन, ‘त्या’ चित्रपटाच्या सेटवर असं काय घडलं होतं? जाणून घ्या
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

‘धडक’ न आवडल्यामुळे हे मीम्स पोस्ट करणाऱ्यांची संख्या यात तुलनेने जास्त आहे. मुळात नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या सुपरहिट मराठी चित्रपटाशी ‘धडक’ची तुलना होत असल्यांमुळे अनेकांनीच त्या दृष्टीने आपली मतं मांडली आहेत.

वाचा : ‘लस्ट स्टोरीज’ : तिच्या ‘लालसे’ची चाकोरीबाहेरची चिकित्सा

सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे मीम पाहता त्यावर चित्रपटातील कलाकार कसे व्यक्त होतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला ‘धडक’ची संपूर्ण टीम या चित्रपटाला मिळणाऱ्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल चाहत्यांचे आभार मानत आहेत.