25 November 2020

News Flash

‘पद्मावत’चे डिस्क्लेमर पाहून नव्या चर्चांना उधाण

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात पाच बदल सुचवले

पद्मावत

विविध धाटणीच्या चित्रपटांचा ट्रेंड असलेल्या बॉलिवूडमध्ये सध्या मात्र एकाच चित्रपट ट्रेंडमध्ये आहे. तो चित्रपट म्हणजे संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’. या चित्रपटाच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेला वाद आतापर्यंत थांबलेला नसून, चित्रपट प्रदर्शित होण्याचा वाटेवर असला तरीही शेवटच्या क्षणापर्यंत त्याविषयीच्या बऱ्याच गोष्टी समोर येत आहेत. जौहरच्या धमक्यांपासून ते चित्रपटातील कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्यांपर्यंत प्रत्येक अडथळा पार करत पद्मावतला सेन्सॉरनेही हिरवा कंदील दिला. पण, त्यातही काही अटी मात्र भन्साळींना पूर्ण कराव्या लागल्या.

चित्रपटाच्या वाटेत आलेले सर्व अडथळे आणि त्यानंतरची परिस्थिती पाहता ‘पद्मावत’च्या टीमने प्रसिद्ध वृत्तपत्रात एक भलेमोठे डिस्क्लेमर छापले असून, ते पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. ‘पद्मावत’च्या डिस्क्लेमरची सोशल मीडियावरही चर्चा पाहायला मिळाली. काही नेटकऱ्यांनी या जाहिरातीविषयी उपरोधिक ट्विटही केल्याचे पाहायला मिळाले. भल्यामोठ्या जाहिरातीच्या रुपात छापण्यात आलेल्या या डिस्क्लेमरमध्ये चित्रपटाविषयी काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.

“हा चित्रपट प्रसिद्ध सुफी कवी मलिक मोहम्मद जायसी यांच्या ‘पद्मावत’ या महाकाव्यावर आधारित असून, हा एक काल्पनिक चित्रपट आहे. ज्यामध्ये राणी पद्मावती आणि अलाउद्दीन खिल्जी यांच्यातील ड्रीम सीक्वेन्सचे एकही दृश्य नव्हते आणि यापुढेही नसेल. राजपूत संस्कृतीविषयी असलेला आदर, त्यांच्यात असलेली धैर्यशील वृत्ती या गोष्टी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच हा चित्रपट साकारण्यात आला आहे. या चित्रपटात प्रचंड आदबीने राणी पद्मावतीच्या व्यक्तिरेखेचे चित्रण करण्यात आले असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही’, असे या डिस्क्लेमरमध्ये लिहिण्यात आले आहे.

सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटात पाच बदल सुचवले असून, चित्रपटाला यू/ए प्रमाणपत्राने प्रमाणित करण्यात आले आहे. त्याव्यतिरिक्त इतर कोणतेही बदल करण्यात आले नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. डिस्क्लेमरच्या शेवटी सरकारी यंत्रणा, सेन्सॉर बोर्ड, चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांनी केलेल्या सहकार्याविषयी त्यांचे आभारही मानण्यात आले आहेत. ‘पद्मावत’ हा एक असा चित्रपट याहे, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल हा मुद्दा अधोरेखित करत भन्साळींनी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी या डिस्क्लेमरच्या माध्यमातून जणू काही आपले मनोगत प्रत्येक प्रेक्षक, समीक्षक आणि जास्तीत जास्त जनसमुदायापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे असे म्हणायला हरकत नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2018 7:47 pm

Web Title: bollywood movie full page padmaavat ad has left the internet dejected for all the right reasons sanjay leela bhansali
Next Stories
1 गर्लफ्रेंड लुलियामुळे सलमान पुन्हा एकदा ट्रोल
2 हृतिकबरोबरच्या अफेअरबद्दल कंगना म्हणते, ‘ना वो रोशनी थी ना अंधेरे..’
3 २ रुपयांत सलमान खानसोबत अक्षय कुमारने बनवले सॅनिटरी नॅपकीन
Just Now!
X