गेल्या आठवड्यात अभिनेता अक्षय कुमार आणि जॉन अब्राहम हे दोघंही चित्रपटांच्या निमित्ताने एकमेकांसमोर उभे ठाकले. विविध धाटणीच्या कथानकांच्या साथीने या दोघांनीही प्रेक्षकांची मनं जिंकण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये दोघांनाही यश मिळालं. पण, यात आता अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ हा चित्रपट बाजी मारताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आठवडा अखेरीस या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांनी चांगलीच उसळी घेतली असून ते ५० कोटींचा आकडा पार करतील असं चित्र आहे. पण, या साऱ्यामध्ये जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटाला काही प्रमाणात निराशेचा सामना करावा लागत असल्याचं स्पष्ट होत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने ३५ कोटींचा आकडा पार केला आहे. समीक्षकांनी या चित्रपटाला फारशी पसंती दिली नव्हती. पण, तरीही सुरुवातीचे दोन दिवस मात्र त्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला होता.

वाचा : Priyanka Chopra Nick Jonas Engagement : निकसोबत प्रेमाचा महाल उभा कर.. आईचा आपुलकीचा सल्ला

मुख्य म्हणजे सध्या प्रेक्षकही या दोन्ही चित्रपटांमध्ये विभागला गेल्यामुळे ही कमाईची शर्यत कोणता अभिनेता किंवा चित्रपट जिंकणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जर, दोन्ही चित्रपटांच्या वाट्याला जवळपास समान कमाई आली, तर खऱ्या अर्थाने ते या खिलाडी कुमार, जॉन आणि त्या दोघांच्याही चित्रपटांसाठी एक मोठं यश ठरणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood movie gold box office day 4 actor akshay kumar starrer film has an edge over john abrahams satyameva jayate
First published on: 19-08-2018 at 17:07 IST