News Flash

VIDEO : ‘हसीना’ची खरी ओळख सांगणारा टिझर प्रदर्शित

'नाम याद रखने की जरुरत नही...'

हसीना पारकर

‘आपकी पेहचान आपके नाम से होती है… इनकी, इनके भाई के नाम से’, या तगड्या संवादासह ‘हसीना पारकर’ या चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. बहिण, आई, मुलगी की गँगस्टर? हसीना पारकरची खरी ओळख काय आहे, हे या टिझरमधून सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटाच्या टिझरमध्ये श्रद्धा कपूरने साकारालेली हसीना पाहताना डोळ्यांची पापणीही लवणार नाही.

भारतीय गुन्हेगारी विश्वात दाऊद इब्राहिम या नावाची जी दहशत होती त्याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या त्याच्या कुटुंबियांच्या राहणीमानावर काय परिणाम झाला होता याचीच झलक ‘हसीना पारकर’ या चित्रपटात दाखवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. एका बहिणीपासून सुरु झालेल्या हसीनाचा प्रवास ‘गॉडमदर’ आणि ‘गँगस्टर’पर्यंत येऊन कधी थांबला याचं प्रभावी चित्रण ‘हसीना…’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पण, त्याआधी प्रदर्शित झालेला हा टिझर चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखीनच वाढवत आहे. ‘अठ्ठासी केसेस दर्ज, पर कोर्टमे हाजरी सिर्फ एक बार’ असं म्हणत या टिझरमध्ये व्हॉईसओव्हरच्या माध्यमातून हसीनाचा त्या काळी असणारा दबदबा सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

वाचा : जाणून घ्या अनुराग कश्यपच्या २३ वर्षीय गर्लफ्रेंडविषयी…

या टिझरपूर्वी श्रद्धाची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाचं एक पोस्टर लाँच करण्यात आलं होतं. या पोस्टरमध्ये श्रद्धाच्या डोळ्यांत गडद सुरमा, सुरम्याच्या त्या रंगातूनही समोरच्याला घाबरवणारी भेदक नजर पाहायला मिळत होती. तिच्या या भूमिकेकडून अनेकांना बऱ्याच अपेक्षा आहेत. अर्थात श्रद्धानेही रुपेरी पडद्यावर हसीना साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतल्याचंही पाहायला मिळालं होतं. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला असून काही तासांच्या अवधीत रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा गुन्हेगारी विश्व, गँगवॉर आणि एका वेगळ्या मुंबईची झलक पाहायला मिळणार आहे असं म्हणायला हरकत नाही. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती नाहिद खान करत असून, या चित्रपटातून दाऊद इब्राहिमच्या भूमिकेत खुद्द श्रद्धाचा भाऊच झळकणार आहे. सिद्धार्थ कपूर आणि श्रद्धा कपूर ही बहिण- भावाची जोडीसुद्धा या चित्रपटातील आकर्षणाचा विषय ठरत आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 8:14 pm

Web Title: bollywood movie haseena parkar teaser actress shraddha kapoor as a crime lord is powerful and fearsome watch video
Next Stories
1 ..असा दिसतो ‘सेजल’चा पंजाबी ‘हॅरी’
2 ‘युनिसेफ’ने घेतली ‘परफेक्ट डॅडी’ची दखल
3 आमिरला चित्रपटात दगा देणारा ‘तो’ झाला यशस्वी अभिनेता
Just Now!
X