News Flash

PHOTO : ‘त्यांच्या’ हसण्यावर खिलाडी कुमार भाळला

सध्या तो आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे

अक्षय कुमार

विविध विषयांवर आधारित चित्रपटांवर भाष्य करण्याला हल्ली बऱ्याच चित्रपट दिग्दर्शकांनी प्राधान्य दिलं आहे. मुख्य म्हणजे बॉलिवूड कलाकारही अशा चित्रपटांचीच निवड करण्यास सर्वतोपरी प्राधान्य देत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच काही कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेता अक्षय कुमार. अक्षय नेहमीच आव्हानात्मक भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकतो. पण, सध्या मात्र त्याच्या वाट्याला अपयश आल्याचं पाहायला मिळत आहे. असं असलं तरीही ‘पॅडमॅन’ या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहून न हिरमुसता अक्षय त्याच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र झाला आहे.

सध्या तो ‘केसरी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये संपूर्ण लक्ष देत असून, या चित्रपटाच्या सेटवर नुकतीच त्याची भेट अशा काही चेहऱ्यांशी झाली ज्यांना पाहून त्याच्याही स्मितहास्य खुलले. अक्षयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या खास मित्रांसोबतचा फोटो पोस्ट केला. खिलाडी कुमारच्या चेहऱ्यावर स्मित आणणारे हे चेहरे म्हणजे सेटवर चित्रीकरणासाठी आलेली काही लहान मुलं. ‘केसरी’मध्ये अफगाणी मुलांची भूमिका साकारण्यासाठी काही लहान मुलं आली होती, ज्यांच्या उपस्थितीमुळे सहाजिकच चित्रपटाच्या सेटवर आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

चिमुकल्यांच्या याच उपस्थितीचा आनंद अक्षयने सर्वांसोबत व्यक्त करत एका फोटोसह कॅप्शन लिहिले, ‘चित्रपटाच्या सेटवर त्यांच्या हसण्याने सर्वत्र चैतन्याचं वातावरण होतं. चित्रीकरणादरम्यान या मुलांशी खेळण्यात खूपच मजा आली.’ असे कॅप्शन देत ही मुलं चित्रपटात अफगाणी मुलांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे अक्षयने स्पष्ट केले. त्यामुळे एका अर्थी गंभीर आणि तितक्याच संवेदनशील विषयावर चित्रपट साकारत असताना सेटवर आनंददायी वातावरण आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

VIDEO: धोनीचा संयम सुटला, मनिष पांडेबद्दल अपशब्द वापरला

अनुराग सिंग दिग्दर्शित ‘केसरी’ हा एक बिग बजेट चित्रपट असून, २०१९ मध्ये तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खिलाडी कुमारची मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटाच्या फर्स्ट लूकने काही दिवसांपूर्वी अनेकांचेच लक्ष वेधले होते. त्यामुळे इतिहासाची पानं उलटल्या जाणाऱ्या या चित्रपटातून सारागढीच्या युद्धाचं चित्रण कसं केलं जाणार याचीच उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 3:41 pm

Web Title: bollywood movie kesari actor akshay kumar shares innocent picture from the sets of his upcoming
Next Stories
1 रणबीरची शेवटची आठवणही दीपिकाने मिटवली?
2 ….म्हणून ‘पॅडमॅन’मधील माझ्या भूमिकेवर कात्री लावली- सोनम कपूर
3 ‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका- शोएब अडकले लग्नबंधनात
Just Now!
X