11 December 2017

News Flash

अनिल कपूर अॅण्ड टीमचा हा सेल्फी कसा वाटला?

'या सेल्फीमध्ये आम्ही कसे काय मावलो हे मलाही कळलं नाही...'

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: June 19, 2017 7:03 PM

छाया सौजन्य- सोशल मीडिया

मोबाईलमध्ये फ्रंट कॅमेरा उपलब्ध करुन दिल्यापासूनच सेल्फीचा ट्रेंड चांगलाच चर्चेत आल्याचं पाहायला मिळालं. कलाकारांवरही या ट्रेंडची जादू पाहायला मिळाली. इतकच काय, तर चित्रपटांमध्येही सेल्फीचा हा ट्रेंड सर्रास वापरलं जात असल्याचं पाहायला मिळत आहे. एव्हरग्रीन अभिनेता अनिल कपूरलाही सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाहीये. मुख्य म्हणजे त्यांच्या ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आलेल्या फोटोमध्ये इतरही काही कलाकार पाहायला मिळत आहेत.

आगामी ‘मुबारका’ या चित्रपटातील हा फोटो सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच पूर्वीच पोस्ट करण्यात आलेला हा फोटो पाहता लग्नाच्या धामधूमीचं धमाल वातावरण या चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. या पोस्टरमध्ये अनिल कपूर आणि अर्जुन कपूर पगडीधारी पंजाबी लूकमध्ये दिसत आहेत. यात अर्जुनची दुहेरी भूमिका पाहायला मिळत आहे. या दोन अभिनेत्यांव्यतिरिक्त अथिया शेट्टी आणि इलियाना डिक्रुजसुद्धा सुरेख लूकमध्ये दिसत आहेत. लग्नाच्या माहोलासाठी त्यांचा हा लूक अगदी परफेक्ट आहे हेसुद्धा तितकच खरं. मुख्य म्हणजे सेल्फीप्रमाणे असलेल्या या पोस्टरसह अनिल कपूर यांनी एक धमाल कॅप्शनही दिलं आहे. ‘या सेल्फीमध्ये आम्ही कसे काय मावलो हे मलाही कळलं नाही…’, असं या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

VIDEO : ‘मन्नत’बाहेर सलमान शाहरुखला आवाज देतो तेव्हा…

अनीस बाझमी दिग्दर्शित हा चित्रपट सध्या बऱ्याच कारणांनी चर्चेत आहे. या चित्रपटातून अर्जुन कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार असल्यामुळे तो या दोन्ही भूमिकांना कशा प्रकारे न्याय देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. २८ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या निमित्ताने अथिया शेट्टी आणि अर्जुनची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. सध्या या चित्रपटाच्या प्रसिद्धीला सुरुवात झाली असून, प्रेक्षकांपर्यंत हा चित्रपट पोहोचवण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करण्यात येणार आहे.

First Published on June 19, 2017 7:03 pm

Web Title: bollywood movie mubarakan poster actor arjun kapoor along with anil kapoor and the ladies pose for a selfie