संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावत’ काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर अनेक समीकरणं बदलली. दमदार दिग्दर्शन आणि चित्रपटाची तगडी स्टारकास्ट यांच्या बळावर ‘पद्मावत’च्या भव्यतेने प्रेक्षकांची मनं जिंकली. दीपिका पदुकोण, रणवीर सिंग आणि शाहिद कपूर या कलाकारांनी साकारलेल्या भूमिकांना तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले. भन्साळींच्या कल्पनाविश्वातून साकारलेल्या या भव्य चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसोबतच सहाय्यक भूमिकांमध्ये झळकलेल्या कलाकारांनीही आपली छाप पाडली. मग तो ‘मलिक कफूर’च्या भूमिकेत झळकलेला जिम सर्भ असो किंवा खिल्जीच्या पत्नीची म्हणजेच ‘मेहरुनिसा’ची भूमिका साकारणारी अदिती राव हैदरी असो.

‘पद्मावत’मध्ये सहाय्यक भूमिकांमध्ये झळकलेल्या या कलाकारांनीसुद्धा त्यांच्या भूमिकांना न्याय दिला असून, प्रेक्षकांनी त्यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला आहे. इथे अलाउद्दीन खिल्जीची भूमिका साकारणाऱ्या रणवीर सिंगची अमिताभ बच्चन यांनी प्रशंसा केली. तर खिल्जीच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अदितीची ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी प्रशंसा केली. अदितीने रुपेरी पदड्यावर साकारालेली निरागस ‘मेहरुनिसा’ आणि तिच्या लोभस सौंदर्याने चित्रपटात स्वत:चं असं एक वेगळं अस्तित्वच निर्माण केलं आहे.

VIDEO : ‘लल्लाटी भंडार’वर खिल्जी थिरकतो तेव्हा

भन्साळींसोबत इतक्या मोठ्या प्रोजेक्टवर काम करण्याचा अनुभव सुरेख असल्याचे अदितीने ‘इंडियन एक्सप्रेस’शी संवाद साधताना सांगितले. ‘मी साकारलेल्या मेहरुनिसा या पात्राला प्रेक्षकांचे प्रेम मिळत असल्याचे पाहून मला फारच आनंद झाला आहे. इतक्या मोठ्या दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळणे ही फार महत्त्वाची बाब आहे. संजय सर तुमच्या भूमिकेसाठी लागणारा अपेक्षित वेळ तुम्हाला देऊ करतात. माझ्या मते मेहरुनिसाच्या भूमिकेविषयी सांगायचे तर, एखादी भूमिका माहिती मिळवून, त्यासाठी बरीच तयारी करुन आणि शिकून ती भूमिका साकारता येत नाही. त्यावेळी दिग्दर्शकाची साथ आणि तुमचा आत्मविश्वास या दोन गोष्टीच सर्वात जास्त महत्त्वाच्या असतात’, असे अदिती म्हणाली.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

https://www.instagram.com/p/Beh20z2Hn5f/

https://www.instagram.com/p/Beh2xmwHU8j/

आतापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत अदितीने कोणत्याही मोठ्या भूमिका साकारल्या नाहीत. मध्यवर्ती भूमिकांमध्ये न झळखताही सहाय्यक अभिनेत्री म्हणून तिने आपली वेगळी ओळख प्रस्थापित केली आहे. भन्साळींच्या ‘पद्मावत’ने तर अदितीच्या करिअरला वेगळीच कलाटणी दिली असून, राणी पद्मावती साकाराणाऱ्या दीपिकालासुद्धा ती टक्कर देतेय असेच प्रेक्षकांचे म्हणणे आहे.

https://www.instagram.com/p/Beh2tfcHwXg/