News Flash

‘पद्मावत’ची घोडदौड सुरुच, चित्रपटाच्या कमाईने पार केला तिहेरी आकडा

वाद आणि विरोधाचं सावट असूनही चित्रपटाची यशस्वी वाटचाल

पद्मावत

एका काव्यावर आधारित कथानकाचा आधार घेत साकारलेल्या ‘पद्मावत’ या चित्रपटाच्या चित्रीकरणापासूनच एक वेगळी वातावरण निर्मिती झाली. ज्याचा फायदा या चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यांमध्ये स्पष्टपणे पाहायला मिळतोय. तणावाच्या वातावरणात भन्साळींचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला खरा. पण, पाहता पाहता त्याने तिकीटबारीवर दणदणीत यश मिळवलं. पहिल्याच आठवड्यात ‘पद्मावत’ने १५५.५ कोटी इतकी कमाई केली असून, फक्त भारतातच नव्हे, तर परदेशातही (चीनसह) धमाकेदार सुरुवात केली आहे. पहिल्या आठवड्याअखेर या चित्रपटाने १.२ कोटींचा गल्ला जमवल्याचे कळत होते, ज्यामध्ये सध्याच्या घडीला सहाजीकच वाढ झाली आहे.

वाद आणि विरोधाचं सावट असतानाही ‘पद्मावत’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळवलं. सोमवारीच या चित्रपटाच्या खात्यात १५ कोटींची कमाई झाली होती. त्यानंतर बुधवारी या चित्रपटाने १२. ५ कोटींची लक्षवेधी कमाई केली असून, आता हा आकडा १५५.५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ‘पद्मावत’ची घोडदौड अशीच सुरु राहिली तर येत्या काळात हा चित्रपटही अनेक विक्रम रचू शकतो आणि काही विक्रम मोडित काढू शकतो असा अंदाजही वर्तवण्यात येत आहे. Boxofficeindia.com च्या माहितीनुसार भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची कामगिरी पाहता येत्या काळात ‘पद्मावत’ २०० कोटींच्या आकडा सहज पार करेल.

वाचा : अखेर दीपिकाने केला खुलासा, ‘पद्मावत’मधील हे दृश्य साकारताना तिचेही डोळे पाणावले

फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोणताच मोठा चित्रपट प्रदर्शित होत नसल्यामुळे त्याचाही फायदा ‘पद्मावत’ला होणार हे नाकारता येणार नाही. तेव्हा आता येत्या काळात भव्यता आणि कल्पनाशक्तीच्या परिसीमा ओलांडणाऱ्या या चित्रपटाच्या कामगिरीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले असणार यात शंका नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 9:06 am

Web Title: bollywood movie padmaavat box office day 7 collection actor ranveer singh starrer crosses 150 crore
Next Stories
1 ‘सूर नवा ध्यास नवा’ला नाना पाटेकर ‘टच’
2 जेव्हा करण जोहर रणवीरवर चिडतो..
3 कास्टिंग काऊचबद्दल मंदिरा म्हणते, टाळी एकाच हाताने वाजत नाही
Just Now!
X