वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या ‘पद्मावती’ या चित्रपटासमोर आता सर्वात मोठा पेच निर्माण झाला आहे. राजपूत संघटनांचा विरोध कमी होता की काय म्हणून आता ‘पद्मावती’विषयी सेन्सॉर बोर्डही नाराज असल्याची चर्चा आहे. म्हटले जात आहे. ‘पद्मावती’च्या निर्मात्यांनी चित्रपटाचे खासगी स्क्रीनिंग केल्यामुळे हा नाराजीचा सूर आळवल्याचे म्हटले जात आहे.

चित्रपटाच्या खासगी स्क्रीनिंगविषयी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या माहितीत प्रसून जोशी म्हणाले, ‘सेन्सॉर बोर्डाने अद्यापही हा चित्रपट पाहिला नाही. त्यासोबतच चित्रपटाला अजूनही प्रमाणित करण्यात आलेले नाही. या परिस्थितीत चित्रपटाचे असे खासगी स्क्रीनिंग करणे आणि राष्ट्रीय वाहिन्यांवर चित्रपटाचे समीक्षण करणे ही बाब अत्यंत निराशाजनक आहे. किंबहुना हे व्यवस्थेच्या विरोधात आहे.’ ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाची तारीख जवळ आल्यामुळे सेन्सॉर बोर्डावर सध्या दबावही टाकला जात असल्याचे त्यांनी उघड केले.

EXCLUSIVE : याआधी आमच्यासाठी भांडलात का? योगेश सोमण यांचा रवी जाधवांना सवाल

एकीकडे चित्रपटाला प्रमाणित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डावर दबाव टाकण्यात येतोय आणि दुसरीकडे अशा प्रकारे खासगी स्क्रीनिंगचे आयोजन करत सेन्सॉरच्या नियमांना पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला जातोय, या मुद्द्यांकडे लक्ष वेधत प्रसून जोशी यांनी आपली नाराजी व्यक्त केली.
चित्रपट प्रमाणित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता झाली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कागदपत्रांमध्ये तो काल्पनिक चित्रपट आहे की ऐतिहासिक हे स्पष्ट करण्यात आलेले नाही. हे जाणून घेण्यासाठी सेन्सॉरने भन्साळींकडे विचारणार केली आहे. पण, उलटपक्षी सेन्सॉरवरच चित्रपट प्रमाणित करण्यात दिरंगाई केली जात असल्याचे आरोप लावले जात आहेत, असेही ते म्हणाले. सेन्सॉरची नाराजी आणि राजपूत संघटनांचा विरोध पाहता आता १ डिसेंबरला ‘पद्मावती’ प्रदर्शित होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…