News Flash

बॉबी देओलने जिंकली नव्या लूकची ‘रेस’

नव्या लूकविषयी बॉबीच्या मनात संमिश्र भावना होत्या

बॉबी देओल

‘रेस’ सीरिजमधील पहिल्या दोन चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाल्यानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘रेस ३’च्या निमित्ताने अभिनेचा बॉबी देओल पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाला असून या चित्रपटातील त्याचा लूक नुकताच समोर आला आहे.

‘रेस ३’ च्या निमित्ताने पिळदार शरीरयष्टीतील बॉबीचा लूक सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याने हा फोटो पोस्ट केला. मुख्य म्हणजे त्याने हा फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये अभिनेता सलमान खानचाही उल्लेख केला आहे. त्याच्या या लूकमध्ये सलमानचा मोलाचा वाटा असल्याचे म्हटले जातेय. आपल्या या नव्या लूकविषयी बॉबीच्या मनात संमिश्र भावना होत्या.

वाचा : कपूर भावंडांमधली नात्यातील दरी वाढली?

सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणाऱ्या फोटोबद्दलही गोंधळला होता. पण, सरतेशेवटी त्याच्या नव्या लूकने अनेकां तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवला. त्यामुळे नव्या लूकची ही ‘रेस’ बॉबीनेच जिंकली असे म्हणायला हरकत नाही. सलमान खान, डेझी शाह, जॅकलिन फर्नांडिस आणि बॉबी देओल अशा तगड्या स्टारकास्टची निवड या चित्रपटासाठी करण्यात आली आहे. तेव्हा आता प्रसिद्ध चेहऱ्यांच्या साथीने ही ‘रेस’ आणखीनच रंगतदार होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रेमो डिसूजा दिग्दर्शित ‘रेस ३’ पुढच्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, रमेश तौरानी या चित्रपटाची निर्मिती करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 5:11 pm

Web Title: bollywood movie race 3 actor bobby deols new look is eye catchy
Next Stories
1 प्रभासचा ‘साहो’ या कारणासाठी असेल खास
2 महिलांसाठी आपल्या समाजात मैत्रीपूर्ण वातावरण नाही; ‘पद्मावती’ वादावर मिस वर्ल्ड मानुषीची प्रतिक्रिया
3 PHOTOS : ‘कॉमेडी क्वीन’च्या लग्नाची लगबग सुरु
Just Now!
X