‘पद्मावत’ या सिनेमाबाबत गेल्या काही महिन्यांपासून वाद सुरु होते. या चित्रपटाची रिलिज डेटही पुढे ढकलण्यात आली. सिनेमा प्रदर्शित होण्यासाठी अवघे दोन दिवस उरलेले असतानाही विरोध थोडाही कमी झालेला नव्हता. अशात या सिनेमाचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. सिनेमा समीक्षकांनी पाहिला. लोकसत्ता ऑनलाइनच्या प्रतिनिधीनेही या सिनेमाला हजेरी लावली होती. सिनेमाची मांडणी आणि कथानकात असलेली ताकद याचे सोने करणारा हा सिनेमा आहे. सिनेमाबाबत जेवढा वाद निर्माण झाला तसे वादग्रस्त सिनेमात काहीही नाही. अभिनयाच्या पातळीवर विचार करता दीपिका पदुकोणने पद्मावतीच्या भूमिकेत बाजी मारली आहे. तर रणवीरच्या खिल्जीच्या भूमिकेत भाव खाऊन गेला आहे. सिनेमाबाबत चर्चा चांगलीच रंगली आहे त्यामुळे या सिनेमाला चांगली ओपनिंग मिळणार यात शंका नाही. एक चांगला सिनेमा बघितल्याचे समाधान प्रेक्षकांना लाभेल असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

चित्रपटाचे लाइव्ह स्क्रीनिंग अपडेट खालीलप्रमाणे

९.११- टाळ्यांचा कडकडाटात ‘पद्मावत’ला समीक्षकांची दाद

९.०८- जौहरचं दृश्य अंगावर काटा आणणारं

९.०५- क्षत्राणियांना राजपूतांची गौरवगाथा सांगणाऱ्या राणी पद्मावतीवरच सर्वांच्या नजरा

९.०० खिल्जी आणि महारावल रतन सिंह आमनेसामने

८.४८- विरहाचे संकेत असतानाही मोठ्या धीराने परिस्थितीला तोंड देण्याची अनोखी भाषा समजावणारं ‘एक दिल एक जान’ गाणं काळजाचा ठाव घेतं.

८.२६- कलाकारांच्या दमदार अभिनयाची झलक असणाऱ्या प्रत्येक दृश्याच्या वेळी सर्वांची उत्कंठा वाढतेय.

८.१३- चित्रपटाचं कथानक पुढे जात असतानाही खिल्जीचीच ‘खलीबली’

७.३५- ‘इतिहास अपने पन्ने बदल सकता है, लेकिन राजपूत अपने उसूल नही’, या दमदार संवादाची वाहवा

७.२७- चित्रपटाच्या बहुतांश दृश्यांमधून राजपूत रणनितीचं उत्तम दर्शन

७.१५- अलाउद्दीन खिल्जीच्या अय्याशीचे वर्णन करणारे एक गाणे बऱ्याच गोष्टी सांगून जात आहे.

७.०८- अलाउद्दीन खिल्जी आणि राणी पद्मावतीचे संवाद ठरत आहेत जमेची बाजू

७.००- मुख्य तीन पात्रांव्यतिरिक्त ‘राजपुरोहित राघव चेतन’ हे पात्र सर्वांची दाद मिळवून जातंय

६.४८- चाणाक्ष, उत्तम युद्धकौशल्य, हजरजबाबीपणा हे तिन्ही गुण असणाऱ्या राणी पद्मावतीची व्यक्तीरेखा लक्षवेधी

६.४३- चित्रपटाच्या सुरुवातीलाच ‘घुमर’ नृत्याची झलक. गाण्यात आक्षेपार्ह असे काहीच नाही.

६.३५- अलाउद्दीन खिल्जीचा क्रूरपणा साकारणाऱ्या रणवीरचं नाणं खणखणीत

६.२७- चित्रपटात तिन्ही मुख्य कलाकारांचा प्रवेश अगदी साध्याच पद्धतीने

६.२४ – ‘पद्मावत’च्या स्क्रीनिंगला सुरुवात