24 November 2020

News Flash

जान्हवीने केली चूक आणि ‘या’ नवख्या अभिनेत्रीला झाला फायदा

अतिशय महत्त्वाची संधी तिच्या हातून निसटली.

जान्हवी कपूर

सध्याच्या घडीला बॉलिवूडमध्ये स्टार किड्सचीच चर्चा पाहायला मिळात आहे. शाहरुख खानपासून ते अगदी सैफ अली खानपर्यंत प्रत्येक सेलिब्रिटीच्या मुला-मुलींचेच वारे कलाविश्वात वाहात आहेत. यामध्ये विशेष लक्ष आहे ते म्हणजे श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर आणि सैफची मुलगी सारा अली खान हिच्यावर. सारा आणि जान्हवी सध्या त्यांच्या आगामी चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहेत. मुख्य म्हणजे पहिला चित्रपट पूर्णत्वास जात नाही तोच या दोघींच्याही वाट्याला आणखी काही प्रोजेक्टही येऊ लागले आहेत.

‘केदारनाथ’ या चित्रपटामध्ये व्यग्र असणाऱ्या साराला रोहित शेट्टीने त्याच्या ‘सिम्बा’ या चित्रपटासाठी निवडलं आहे. पण, या चित्रपटासाठी रोहितने पहिली पसंती जान्हवीला दिली होती. जान्हवीच्याच एका चुकिमुळे ही संधी तिच्या हातून निसटल्याच्या चर्चांनी सध्या जोर धरला आहे.

‘टाईम्स नाऊ’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रणवीर सिंगची मुख्य भूमिका असणाऱ्या ‘सिम्बा’ या चित्रपटाची स्क्रीप्ट जान्हवी आणि सारा या दोघींनाही ऐकवण्यात आली होती. मुख्य म्हणजे जान्हवीच या चित्रपटासाठी रोहितची पहिली पसंती होती. पण, ‘सिम्बा’मध्ये आपली निवड होणार असल्याची माहिती जान्हवीने लीक केली. ज्यामुळे हा चित्रपट आणि अतिशय महत्त्वाची संधी तिच्या हातून निसटली. अनप्रोफेशनल वागण्यामुळेच ती या संधीला मुकली असं अनेकांचं म्हणणं आहे. करिअरच्या दृष्टीने पाहायला गेलं, तर हा जान्हवीच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा चित्रपट ठरला असता.

वाचा : ‘त्या’ तिघांमुळे माझ्या आयुष्याची कहाणीच बदलली- सनी लिओनी

सध्या जान्हवी धर्मा प्रॉडक्शन्स अंतर्गत साकारणाऱ्या ‘धडक’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटातून ती इशान खट्टरसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. बी- टाऊनमध्ये जान्हवी आणि सारा या दोघीही जवळपास एकाच वेळी पदार्पण करणार असल्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनावर कोणाची जादू चालते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे हेच खरं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 5, 2018 11:25 am

Web Title: bollywood movie simmba sara ali khan was not the first choice janhvi kapoor was the choice but she could not get the role in rohit shetty and karan johar film
Next Stories
1 Blackbuck Poaching Verdict: काळवीट शिकार प्रकरणी सलमान ‘एकटा’ खलनायक
2 सगळे वाद ‘तेरे नाम’
3 Blackbuck Poaching Case: सलमान, सोनाली बेंद्रे, तब्बूला सहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा?
Just Now!
X