25 September 2020

News Flash

VIDEO : …म्हणून कंगना म्हणतेय ‘सिंगल रहने दे’

'मजानी लाइफ' म्हणणारी कंगना अनेकांचीच मनं जिंकतेय

कंगना रणौत

बॉलिवूडची ‘क्वीन’ कोण, असा प्रश्न विचारला तर अनेकांच्या डोळ्यामोर कंगना रणौतचाच चेहरा येतो. अशी ही क्वीन कंगना पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकण्यासाठी तयार झालीय. पण, यावेळी ती ‘सिमरन’च्या भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहे. हंसल मेहता यांच्या आगामी ‘सिमरन’ या चित्रपटातून ती एका दिलखुलास मुलीच्या भूमिकेत झळकणार आहे. या बहुचर्चित चित्रपटातील ‘सिंगल रहने दे’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘सिंगल रहने दे’ असे बोल असणारं हे गाणं शाल्मली खोलगडे आणि दिव्य कुमार यांनी गायलं असून, वायुने ते लिहिलं आहे. सचिन- जिगरने अगदी हटके अंदाजात गाण्याला संगीतबद्ध केलंय. गाण्याच्या सुरुवातीलाच कंगना स्वत:ची ओळख ‘मनीबेन’ म्हणून करुन देत आहे. मुलगी वयात आल्यावर तिच्यामागे घरातल्या मंडळींकडून लग्न करण्यासाठीचा जो तगादा लावण्यात येतो, त्यावरच या गाण्यातून अनोख्या पद्धतीने प्रकाश टाकण्यात आला आहे. त्याशिवाय एक मुलगी सिंगल राहण्यासाठी आपल्या वडिलांना कशा प्रकारे आपलं म्हणणं पटवून देतेय याचा धमाल अंदाज गाण्यात पाहायला मिळतोय. त्यातच ‘मजानी लाइफ’ असं म्हणणारी कंगना अनेकांचीच मनं जिंकतेय.

पाहा : सलमान, हृतिकला टक्कर देतोय हा आयपीएस अधिकारी

विविध धाटणीच्या भूमिका मोठ्या कौशल्याने प्रेक्षकांसमोर सादर करणारी कंगना ‘सिमरन’मध्ये क्लेप्टोमेनिया झालेल्या एका दिलखुलास मुलीच्या भूमिकेत दिसेल. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. अगदी तेव्हापासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कुतूहल पाहायला मिळतंय. भूषण कुमार, शैलेश आर. सिंग, कृष्ण कुमार आणि अमित अग्रवाल यांची निर्मिती असलेला हा चित्रपट १५ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 2, 2017 6:43 pm

Web Title: bollywood movie simran new song single rehne de kangana ranaut becomes the queen of single ladies watch video
Next Stories
1 फातिमा- इरा म्हणाल्या ईद मुबारक
2 VIDEO : ..म्हणून सेलिब्रिटी रंगले विठू नामाच्या गजरात
3 ‘प्रसिद्धीसाठी हृतिकच्या नावाची गरज नाही’
Just Now!
X