20 January 2021

News Flash

Stree song Kamariya: ‘कमरिया’मधील नोराच्या अदांनी प्रेक्षक पुन्हा घायाळ

'कमरिया' या गाण्याची संपूर्ण संकल्पना आणि त्यासाठी आपल्याला देण्यात आलेला लूक आपल्या पसंतीस पडल्याचं नोराने स्पष्ट केलं.

नोरा फतेही, Stree song Kamariya Nora Fatehi

जॉन अब्राहम स्टारर ‘सत्यमेव जयते’ या चित्रपटातील ‘दिलबर’ या गाण्यावर थिरकणारी अभिनेत्री, मॉडेल नोरा फतेही तिच्या अदांनी प्रेक्षकांना पुन्हा घायाळ करत आहे. यावेळी तिच्यासोबत पडद्यावर झळकत असणारे अभिनेते आहेत अपारशक्ती खुराना आणि राजकुमार राव. Stree song Kamariya Nora Fatehi

दिनेश विजन दिग्दर्शित विनोदी भयपट असणाऱ्या ‘स्त्री’ या चित्रपटातील ‘कमरिया’ हे गाणं नुकतच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे ‘दिलबर’ फेम अभिनेत्री नोरा फतेही पुन्हा एकदा तिच्या अदांनी सर्वांनाच घायाळ करत आहे. आस्था गिल, सचिन संघवी, जिगर सरैय्या आणि दिव्य कुमार यांनी गायलेलं हे गाणं सचिन- जिगर या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलं आहे. अवघ्या काही क्षणांमध्येच सोशल मीडियावरही या गाण्याला अक्षरश: उचलून घेण्यात आलं. ज्यानंतर #Kamariya असा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये आला.

वाचा : त्याची चोरी मी पकडली होती, एक्स बॉयफ्रेंडविषयी दीपिकाने केला खुलासा

‘कमरिया’ या गाण्याची संपूर्ण संकल्पना आणि त्यासाठी आपल्याला देण्यात आलेला लूक आपल्या पसंतीस पडल्याचं नोराने स्पष्ट केलं. तेव्हा आता ‘दिलबर’प्रमाणेच तिचं हे गाणंसुद्धा युट्यूबवर धुमाकूळ घालणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. सध्याच्या घडीला नोराच्या अदांसोबतच तिच्या मानधनाचीही बरीच चर्चा होत आहे. सलमान खानच्या ‘भारत’ या चित्रपटासाठीही तिची वर्णी लागल्यामुळे आता या सौंदर्यवतीने तिच्या मानधनाच चांगलीच वाढ केल्याचं कळत आहे. दरम्यान, नोराच्या अदांची जोड असणारा आणि राजकुमार राव, श्रद्धा कपूर यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा ‘स्त्री’ हा चित्रपट ३१ ऑगस्टला प्रदर्शित होत असून, बॉक्स ऑफिसवर कितपत यशस्वी ठरतो याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2018 1:34 pm

Web Title: bollywood movie stree song kamariya nora fatehi adds oomph to rajkummar rao shraddha kapoors horror comedy
Next Stories
1 निराधारांना आधार देणाऱ्या बाळूमामांचं चरित्र लवकरच छोट्या पडद्यावर
2 Manmarziyan Trailer: जोडीदाराच्या शोधात निघाला आहे अभिषेक, इथे कोणाच्या ‘मनमर्जियां’ चालणार?
3 मुलाच्या बॉलिवूड पदार्पणाविषयी अक्षय म्हणतो…
Just Now!
X