03 March 2021

News Flash

‘छपाक’ला धोबीपछाड; बॉक्स ऑफिसवर ‘तान्हाजी’चं राज्य

'तान्हाजी' प्रभासच्या 'बाहुबली'लाही टक्कर देईल असं दिसून येतंय

अभिनेता अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट अलिकडेच प्रदर्शित झाला. पहिल्या सहा दिवसांमध्ये १०० कोटींचा गल्ला पार करणाऱ्या या चित्रपटाची घोडदौड अद्यापही सुरुच आहे. या चित्रपटाच्या कमाईचे आकडे पाहिल्यानंतर त्याच्या स्पर्धेत अन्य कोणताही चित्रपट नसल्याचं दिसून येत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून ‘तान्हाजी’ची कमाई सांगितली आहे.

‘तान्हाजी’ने नवव्या दिवशी १६.३६ कोटी रुपयांची कमाई केली असून आतापर्यंत या चित्रपटाची एकूण कमाई १४५.३३ कोटी रुपये झाली आहे. विशेष म्हणजे या कमाईचा वेग असाच राहिला. तर हा चित्रपट लवकरच १५० कोटींचा टप्पा पार करेल असं एकंदरीत दिसून येत आहे.


दरम्यान, ‘तान्हाजी’सोबतच मेघना गुलजार यांचा ‘छपाक’ प्रदर्शित झाला होता. मात्र ‘तान्हाजी’ने कमाईमध्ये या चित्रपटावरही मात केली आहे. ‘छपाक’ने आतापर्यंत केवळ २८.३८ कोटी रुपयांचीच कमाई केली आहे. इतकचं नाही तर ‘तान्हाजी’ची कमाई अशीच वाढत राहिली तर लवकरच तो दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘बाहुबली’ या चित्रपटालाही टक्कर देईल असं दिसून येतंय

‘तान्हाजी’ : काजोलच्या जाऊबाईंच्या भूमिकेतील मराठमोळ्या अभिनेत्रीचे ग्लॅमरस फोटो

‘तान्हाजी’मध्ये अजय देवगण मुख्य भूमिकेत झळकला असून काजोलने तान्हाजी मालुसरे यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात अजिंक्य देव,  शरद केळकर, शशांक शेंडे, देवदत्त नागे,जगन्नाथ निवंगुणे,प्रसन्न केतकर, भाग्यश्री  न्हालवे यांच्यासह अनेक मराठी कलाकार झळकले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 9:24 am

Web Title: bollywood movie tanhaji box office collection ajay devgn kajol saif ali khan film ssj 93
Next Stories
1 शबाना आझमी यांची प्रकृती स्थिर
2 भावेश पाटील यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याचे ‘रहस्य’
3 ऑस्कर हवं की स्टारडम? अभिनेत्रीने दिलं मजेशीर उत्तर
Just Now!
X