26 September 2020

News Flash

४ वर्षांच्या अफेअरनंतर भूमिका चावला त्याला म्हणाली होती, ‘तेरे नाम…’

तेलुगू चित्रपटातून तिने या क्षेत्रात पदार्पण केलं.

भूमिका चावला

बॉलिवूडमध्ये दरवर्षी बरेच चित्रपट प्रदर्शित होतात. अनेक कलाकारांच्या आयुष्याला वेगळंच वळण देणाऱ्या या क्षेत्रामध्ये आजवर बऱ्याच जणांना लोकप्रियता आणि यश मिळालं आहे. तर काही जणांना आयुष्यभराची शिकवण मिळाली आहे. प्रेम, कौटुंबिक मूल्य, संस्कार आणि मनोरंजन असं संपूर्ण पॅकेज असणाऱ्या काही चित्रपटांपैकी एक म्हणजे तेरे नाम. सलमान खान आणि भूमिका चावला ही नवी कोरी जोडी या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला जवळपास १४ वर्षे उलटूनही आजही तो अनेकांच्याच फेव्हरेट लिस्टचा एक भाग आहे.

‘तेरे नाम’मुळे सलमानच्या अभिनय कौशल्याची झलक तर सर्वांनी पाहिलीच होती. पण, त्याच्या कारकिर्दीला या चित्रपटामुळे कलाटणीही मिळाली. त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणाऱ्या भूमिकाच्या करिअरवर मात्र या चित्रपटामुळे फारसा फरक पडला नाही. एका पंजाबी, सैनिक कुटुंबात जन्मलेल्या भूमिकाने १९९७ मध्ये मुंबईत येऊन जाहिराती, हिंदी म्युझिक अल्बम आणि टेलिव्हिजन शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली. तिने २००० मध्ये ‘युवकुडू’ या तेलुगू चित्रपटातून तिने चित्रपट विश्वात पदार्पण केलं. त्यानंतर २००१ मध्ये पवन कल्याणसोबत ‘कुशी’ या चित्रपटातही तिने काम केलं. त्यामागोमागच २००३ हे वर्ष भूमिकासाठी महत्त्वाचं ठरलं. कारण, याच वर्षी ‘तेरे नाम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटानेतर ‘रन’, ‘दिल ने जिसे अपना कहा’, ‘सिलसिले’ या चित्रपटांमध्ये तिने काम केलं खरं. पण, तिच्या करिअरला काही चालना मिळाली नाही.

वाचा : कमल हसनच्या ‘अप्पूराजा’तील ‘अप्पू’ साकारण्यासाठी करण्यात आल्या होत्या या करामती

चित्रपटांमध्ये मिळालेल्या अपयशानंतर भूमिकाचं हळहळू चित्रपटसृष्टीत दिसणं कमी झालं. २००७ मध्ये तिने प्रियकर भरत ठाकूरसोबत लग्न केलं होतं. भूमिका भरतकडेच योगा शिकण्यासाठी जायची. नाशिकच्या एका गुरुद्वारामध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. भूमिका गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘एम. एस. धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामध्ये झळकली. या चित्रपटात तिने धोनीच्या बहिणीची भूमिका साकारली. भूमिकाच्या वाट्याला फार भूमिका आल्या नसल्या तरीही तिच्या सालसपणामुळे चाहते आजही तिच्यावर तितकंच प्रेम करतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 10:34 am

Web Title: bollywood movie tere naam m s dhoni fame actress bhumika chawla who shared screen with salman khan married bharat thakur personal life
Next Stories
1 ‘अक्षरा’च्या आवाजातील ‘वंदे मातरम्’ ऐकलंत का?
2 ‘त्या’ प्रसंगाबद्दल अक्षयने मानले हृतिकचे आभार?
3 आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचं ब्रेकअप
Just Now!
X