30 September 2020

News Flash

VIDEO: खिलाडी कुमारला स्टंटबाजी पडली महागात

अक्षय कुमारचा तोल गेला अन्....

छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

चित्रपटसृष्टीमध्ये स्टंट करण्यापासून पळ न काढणारा आणि थरारक दृश्यांना एका वेगळ्याच पातळीवर नेणारा अभिनेता म्हणजे अक्षय कुमार. कोणताही स्टंट असो अक्षय तो अगदी सहजपणे करतो. त्यामुळेच त्याला बॉलिवूडचा खिलाडी आणि स्टंटमॅनही म्हटलं जातं. पण, स्टंट करण्याची हीच सवय त्याला महागात पडल्याचं नुकतंच पाहायला मिळालं. अक्षयने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये ही स्टंटबाजी त्याला महागात पडल्याचं पाहायला मिळत आहे.

स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने सर्वांनाच या खास दिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अनोख्या अंदाजात त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला. सायकल चालवण्याचा आनंद घेत असलेल्या खिलाडीने मध्येच दोन्ही हात सोडून देत सायकलचा तोल सावरत स्वातंत्र्यदिनाचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवला. ‘मी आज या देशात आहे ज्याच्यापासून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. मी तुम्हाला सांगूही शकत नाही की, ज्याप्रमाणे आपल्या देशात मला स्वातंत्र्याची अनुभूती होते अगदी त्याचप्रमाणे मला या ठिकाणीसुद्धी स्वातंत्र्याची अनुभूती होत आहे’, असं तो म्हणाला. पण, हा व्हिडिओ संपतेवेळी रस्त्याच्या कडेने सायकल चालवणाऱ्या अक्षय कुमारचा तोल गेला आणि तो गवतात जाऊन पडला.

वाचा : रवीनाने अक्षय कुमारला ‘या’ अभिनेत्रींसोबत पकडलं होतं…

अवघ्या काही सेकंदांतच हा सर्व प्रकार घडला. त्यामुळे आपण केलेला हा स्टंट इतर कोणीही करु नये असं त्याने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्येही म्हटलं आहे. खिलाडी कुमारला बरेच जण फॉलो करतात. तेव्हा चुकीच्या प्रकारे आपल्या पावलावर पाऊल ठेवून चाहत्यांनी स्वत:ला इजा पोहोचवू नये याच भावनेने त्याने सावधगिरीचा इशारा दिला असावा.  दरम्यान, अक्षय सध्या ‘गोल्ड’ या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र असून, त्यासाठी तो बरीच मेहनत घेत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 1:12 pm

Web Title: bollywood movie toilet ek prem katha actor akshay kumar cycle stunt goes wrong while wishing his fans for independence day video
Next Stories
1 बॉलिवूडच्या स्टायलिश बहिणींची जोडी
2 ‘फॅट टू फिट’, अदनान सामीच्या मुलाचा प्रवास
3 मानलेल्या मुलाने घेतली दिलीप कुमार यांची भेट
Just Now!
X