21 September 2020

News Flash

‘त्या’ प्रसंगाबद्दल अक्षयने मानले हृतिकचे आभार?

मला प्रेक्षकांची दाद मिळाली असो वा नसो पण....

अक्षय कुमार

खिलाडी कुमारच्या ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ या चित्रपटाने सर्वदूर प्रसिद्धी मिळवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमध्ये ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ यशस्वी ठरत आहे. प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या चार दिवसांमध्ये या चित्रपटाने ६३. ४५ कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे येत्या काळात हे कमाईचे आकडे वाढतील ही बाब नाकारता येणार नाही. चित्रपटाला मिळत असलेलं यश पाहून खुद्द खिलाडी कुमारनेच सोशल मीडियावरुन समीक्षक आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

चित्रपटातील त्रुटी अधोरेखित करत त्याची जमेची बाजूही सर्वांसमोर मांडण्यासाठी अक्षयने एका व्हिडिओतून सर्वांचे आभार मानले आहेत. मुख्य म्हणजे त्याने या व्हिडिओतून अभिनेता हृतिक रोशनचेही आभार मानले आहेत. ‘ज्यांनी हा चित्रपट पाहिला त्यांच्यापैकी काही जणांनी अक्षय कुमार नेहमीच सरकारी योजनांचा प्रचार करत असतो अशा प्रतिक्रिया दिल्या. पण, त्याच प्रेक्षकांचं या चित्रपटाने मनोरंजनही झालं. तेच माझ्या संवादांवर खळखळून हसलेसुद्धा, टाळ्या वाजवून प्रतिसाद दिली. मला प्रेक्षकांची दाद मिळाली असो वा नसो पण, एक महत्त्वाचा संदेश मी कायमच सर्वांपर्यंत पोहोचवत राहिन’, असं तो म्हणाला. ‘मी सर्वांचेच आभार मानतो. मित्रपरिवार, चित्रपटसृष्टी आणि मुख्य म्हणजे माझा खूप चांगला मित्र हृतिक रोशनचेही मी आभार मानतो. त्याचे आभार मी का मानत आहे हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल, असं अक्षय म्हणाला.

गेल्या वर्षी हृतिक रोशनच्या ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटासोबतच अक्षयचा ‘रुस्तम’ प्रदर्शित झाला होता. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने प्रदर्शित झालेल्या या दोन्ही चित्रपटामंध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली होती. या स्पर्धेत अक्षयच्या ‘रुस्तम’ने बाजी मारली होती. तेव्हापासूनच या दोघांमध्येही ‘ऑल इज नॉट वेल’ असल्याचं म्हटलं जात होतं. त्यामुळेच अक्षयने आपल्या नात्यात आलेला दुरावा कमी करण्यासाठी हृतिकच्या नावे हा संदेश पाठवला असावा असं म्हटलं जातंय.

वाचा : ‘चक दे! इंडिया’विषयी या गोष्टी तुम्हाला माहितीयेत का?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 9:14 am

Web Title: bollywood movie toilet ek prem katha actor akshay kumar thanks fans critics and hrithik roshan for the films success video
Next Stories
1 आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्राचं ब्रेकअप
2 …म्हणून नवज्योत सिंग सिद्धू कपिल शर्मावर भडकले!
3 रोहित शेट्टीसाठी रणवीर- कतरिना एकत्र येणार?
Just Now!
X