कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाइट’ या चित्रपटाचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. कबीरने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुनच ‘मै अगर’ हे गाणं प्रदर्शित करत अनेकांना ‘लक्ष्मण बिश्त’च्या विश्वाची सफर घडवून आणली आहे. अमिताभ भट्टाचार्यच्या लेखणीतून उतरलेल्या या गाण्याला प्रितमने संगीतबद्ध केलं आहे.

‘मै अगर सितारोंसे चुरा के लाऊ रोशनी…’ असे बोल असणाऱ्या या गाण्यातून बालकलाकार माटिन रे तंगू आणि झू झू सोबतची सलमानची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. त्यासोबतच हे गाणं पाहताना ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील ‘मुन्नी’ म्हणजेच हर्षालीची आठवणही येत आहे. त्या चित्रपटातही हर्षाली मल्होत्रा आणि सलमानचं निरागस नातं प्रेक्षकांची मनं जिंकून गेलं होतं. सलमान आणि माटिनमधील अगदी त्याच प्रकारचं नातं ‘ट्युबलाइट’च्या या गाण्यात पाहायला मिळत आहे. आतिफ अस्लमच्या आवाजातील हे भावनिक गाणं पाहता सलमानचा हा चित्रपट म्हणजे एक प्रकारची रोलरकोस्टर राईड असणार आहे असंच दिसतंय.

prarthana behere says she and her husband do not want child
“आम्हाला मूल नको, कारण…”, प्रार्थना बेहेरेचा वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलासा; म्हणाली, “माझे सासू-सासरे…”
Amruta Khanvilkar slam trollers
“तुम्हाला फक्त स्वतःची लाज वाटायला पाहिजे”, ट्रोलर्सवर संतापली अमृता खानविलकर; म्हणाली, “गप्प राहणं हे…”
Nutritious but tasty Makhana Uttapam Try this recipe once
पौष्टिक पण चविष्ट असा मखाना उत्तपा! एकदा खाऊन तर पाहा, ही घ्या रेसिपी
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

कबीर खानच्या या चित्रपटामध्ये सलमानच्या अभिनयाचा आणखी एक पैलू पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे प्रोमो, पोस्टर, ट्रेलर आणि गाणी पाहता हा ‘लक्ष्मण सिंग बिश्त’ प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेची सफर घडवणार असं म्हणायला हरकत नाही. ‘ट्युबलाइट’ या चित्रपटामध्ये १९६० च्या दशकातील काळ साकारण्यात आला असून, चित्रपटाचं बरंच चित्रीकरण लडाख, हिमाचल प्रदेश या भागांत करण्यात आलं आहे. त्यामुळे या चित्रपटामध्ये कथानकासोबत प्रेक्षकांना काही सुरेख ठिकाणंही पाहायला मिळणार आहेत. ‘ट्युबलाइट’च्या निमित्ताने कबीर खान आणि सलमान हे समीकरण पुन्हा एकदा जुळून आलंय. त्यामुळे या चित्रपटाकडून प्रेक्षकांसोबतच कबीर- सलमानलाही बऱ्याच अपेक्षा असणार यात शंकाच नाही.

वाचा : पोरगी पास होण्याचं सुख काय असतं ते भाऊ कदमला विचारा

दरम्यान, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअर या जगप्रसिद्ध भागात ‘ट्युबलाइट’चे पोस्टर लावण्यात आले आहेत. सध्याच्या घडीला वापरलेली ही वेगवेगळी प्रसिद्धी तंत्र पाहता चित्रपट निर्मात्यांनी ‘ट्युबलाइट’च्या प्रमोशनमध्ये कोणतीही कसर शिल्लक ठेवली नाहीये असंच पाहायला मिळत आहे.