07 August 2020

News Flash

Salman Khan Controversies: ‘सुलतान’च्या आयुष्यातले ते कठीण क्षण

सलमानच्या काही वादग्रस्त व्यक्तव्यांचा घेतलेला आढावा

सलमान खान

वाद आणि सलमान हे दोन्ही शब्द समांतरच जातात. हिट अँड रन केस, काळविट शिकार प्रकरण, अवैध्य शस्त्र बाळगणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकल्यानंतरही त्याच्या मागचे वाद काही थांबले नाहीत.

बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याबद्दल जोधपूर न्यायालयाने १८ जानेवारीला त्याची निर्दोष मुक्तता केली. तसेच काही महिन्यांपूर्वी हिट अँड रन प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. २००२ मध्ये सलमाने मद्यधुंद अवस्थेत वांद्रे येथे पदपथावर झोपलेल्या चार जणांना चिरडले होते. यात एकाचा मृत्यू झाला होता.

याशिवाय सार्वजनिक ठिकाणी सलमान वादग्रस्त वक्तव्यं आणि कृतीने सतत वाद ओढवून घेत असतो. सलमानच्या अशाच काही वादग्रस्त व्यक्तव्यांचा घेतलेला आढावा.

मला बलात्कारी महिलेसारखे वाटतेः ‘सुलतान’ सिनेमाच्या चित्रिकरणावेळी जेव्हा मी त्या रिंगणाच्या बाहेर यायचो तेव्हा मला एखाद्या बलात्कार झालेल्या महिलेसारखेच वाटायचे.

याकुब मेननः टायगर मेननला पकडा त्याला फाशीवर चढवा पण त्याच्या भावाला म्हणजे याकुब मेननला नाही.

दीपिका, प्रियांकाचे हॉलिवूड पदार्पणः दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा यांच्या हॉलिवूड सिनेमांबद्दल बोलताना सलमान एकदा म्हणाला होता की, त्या दोघी आता हॉलिवूडमध्ये गेल्यामुळे त्यांचा हिंदी सिनेसृष्टीशी संबंध संपला आहे.

लग्नः जेव्हा मी साखरपुडा करेन किंवा लग्न करेन तेव्हा मी स्वतःहून सगळ्यांना सांगेन. आधीचे कलाकार त्यांचा चाहता वर्ग कमी होईल म्हणून जसे त्यांचे लग्न लपवून ठेवायचे तसं मी अजिबात करणार नाही.

कतरिना कैफ कामगार आहेः तुम्हा सर्वांना कतरिना सर्वात मोठी स्टार वाटते. पण माझ्या मते ती एक कामगार आहे. एखाद्या कामगाराप्रमाणेच ती स्वतःवर सतत काम करत असते. तुम्ही सगळ्यांनी तिच्याकडून ही गोष्ट शिकली पाहिजे.

संजय लीला भन्साळीः संजय साहेब तर ‘खामोशी’ आणि ‘हम दिल दे चुके सनम’ या दोन सिनेमांच्या पुण्याईवरच आतापर्यंत सिनेसृष्टीत टिकून आहेत.

शाहरुख खानः शाहरुख नेहमीच मला वादात अडकवतो. तो बोलून निघून जातो पण नंतर मलाच त्याला मदत करायला मध्यस्थी यावे लागते.

कॉफी विथ करणः मी अजूनही व्हर्जिन आहे

गुझारिश सिनेमाः हा सिनेमा बघायला कुत्राही गेला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 18, 2017 12:23 pm

Web Title: bollywood movies salman khan and controversy statements arms act case jodhpur
टॅग Salman Khan
Next Stories
1 कॉमेडियन भारती सिंग लवकरच विवाहबंधनात अडकणार
2 Ajay Devgan:सलमानवरील नाराजीमुळे अजयने अवलंबला हा मार्ग?
3 शेरदिलच्या ‘शेर’ने श्रोते खूश
Just Now!
X