News Flash

#PosterLagwaDo : क्रिती- कार्तिकला सरप्राइज देण्यासाठी आला खास पाहुणा

'पोस्टर लगवा दो' गाण्याचा प्रमोशनल व्हिडिओ क्रितीनं आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे.

अभिनेत्री क्रिती सॅनॉन आणि कार्तिक आर्यन या दोघांच्या प्रेमाची भन्नाट गोष्ट सांगणारा ‘लुका छुपी’ चित्रपट मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लग्नाआधी लिव्हइन रिलेशनमध्ये राहणाऱ्या जोडप्याला आपलं पितळ सर्वांसमोर उघड पडू नये यासाठी करावी लागणारी कसरत आणि त्यातून घडणारे धम्माल प्रसंग या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

या चित्रपटात अक्षय कुमारचं गाजलेलं ‘पोस्टर लगवा दो’ हे गाणं रिक्रेएट करण्यात आलं आहे. या गाण्याचा प्रमोशनल व्हिडिओ नुकताच कार्तिक आणि क्रितीनं शूट केला. या व्हिडीओत खुद्द अक्षय कुमारच पाहुणा कलाकार म्हणून पाहायला मिळाला.

‘पोस्टर लगवा दो’ गाण्याचा प्रमोशनल व्हिडिओ क्रितीनं आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. प्रमोशनल व्हिडिओमध्ये जरी अक्षय कुमार दिसत असला तरी मूळ गाण्यातही तो दिसणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. २९ जानेवारीला ‘पोस्टर लगवा दो’ हे गाणं प्रदर्शित होत आहे.
‘लुका छुपी’च्या निमित्तानं पहिल्यांदाच क्रिती आणि कार्तिक एकत्र काम करत आहेत. क्रिती-कार्तिकसह अपारशक्ती खुराना, पंकज त्रिपाठी, विनय पाठक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १ मार्च २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2019 7:12 pm

Web Title: bollywood mr khiladi has special appereance in luka chuppi poster lagva do
Next Stories
1 Video : ‘डोक्याला शॉट’चा भन्नाट टीझर प्रदर्शित
2 लोकाग्रहाखातर मी दोनशेवेळा डोळा मारला-प्रिया
3 Video : समाजातील विषमतेची ‘दुरी’ गली बॉयच्या गाण्यात
Just Now!
X