News Flash

बॅालीवूड संगीतकार मनन आणि दिग्दर्शक विहान यांचे मराठी सिनेसृष्टीत पाऊल

जाणून घ्या कोण आहेत मनन शाह आणि विहान सुर्यवंशी

लॉकडाऊन अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ज्या प्रमाणे सगळ्यागोष्टी पुर्वपदावर येऊ लागल्या, त्याच प्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतही कामाला वेग आला आहे. ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणास नुकतीच पुण्यात सुरूवात झाली आहे. बॅालीवुडमधील सुप्रसिद्ध फिल्ममेकर विपुल अमृतलाल शाह यांचे पुतणे संगीतकार मनन शाह ‘रूप नगर के चीते’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विहान सूर्यवंशी करीत आहेत. पुणे शहर आणि परिसरात चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे.

बॉलीवूड मधील अर्जित सिंग, अतीफ असलम, राहत फतेह अली खान, अरमान मलिक यांसारख्या आघाडीच्या गायकांसोबत मनन शाह यांनी संगीतकार म्हणून काम केले आहे. ‘अखियाँ मिलावांगा’, ‘तेरे लिये’, ‘सावन बैरी’ यांसारखी बॉलीवूडमधील अनेक हिट रोमँटिक गाणी मनन शाह यांनी संगीतबद्ध केली आहेत. ज्येष्ठ लेखक, गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबतही ही त्यांनी खूप काम केले आहे.

बॉलीवूडचे हिट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या ‘स्कूल, कॉलेज आणि लाईफ’ या पहिल्या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन केलेल्या युवा दिग्दर्शक विहान सूर्यवंशी यांनी ‘रूप नगर के चीते’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मनन शाह आणि विहान सूर्यवंशी यांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवायला सज्ज झाली आहे. हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा व रोमांचक अनुभव असेल असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला आहे.

‘रूप नगर के चीते’ हा चित्रपट दोन बालमित्रांचा रोमहर्षक प्रवास आणि एका घटनेनंतर त्यांचं दोन वेगळ्या शहरांतील विरोधाभासी जीवन दर्शवणारा आहे. मैत्रीतील आजवर कधीही न उलगडलेले काही दुर्लक्षित पैलू यात सादर करण्यात आले आहेत. हटके शीर्षक असलेल्या या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटातील दोन मध्यवर्ती व्यक्तिरेखेच्या भूमिका पडद्यावर कोण साकारणार? याबद्दल औत्सुक्य निर्माण झाले आहे. तर ‘रूप नगर के चीते’ हा चित्रपट २०२१ च्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2021 3:11 pm

Web Title: bollywood music director mannan shah and director vihan suryavanshi are entered in marathi film industry dcp 98
Next Stories
1 जागतिक महिला दिवस : वामिका आणि अनुष्काचा फोटो शेअर करत विराट म्हणाला..
2 तब्बल सहा महिन्यांनी रिया चक्रवर्तीची पोस्ट, शेअर केला ‘हा’ फोटो
3 वाढते वजन राष्ट्रीय मुद्दा बनला म्हणून, विद्या करत होती स्वत:चा तिरस्कार..
Just Now!
X