News Flash

शब्दांच्या पलिकडले : रात कली एक ख्वाब में आई

पंचेचाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या मुंबईचे दर्शन घडते.

जुन्या चित्रपट गीत संगीताची वैशिष्ट्ये केवढी तरी. त्यातीलच एक म्हणजे त्यातून पंचेचाळीस-पन्नास वर्षांपूर्वीच्या मुंबईचे देखील दर्शन घडते.
रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई

‘बुढ्ढा मिल गया’चे (1९७1) हे संपूर्ण गाणे वांद्र्याचा ‘बॅन्ड स्टॅन्ड’च्या पडक्या किल्ल्यात चित्रीत झालेय. पण एकाच जागेवर अख्खे प्रेमगीत खुलवण्यातही यश मिळालयं. कारण या चित्रपटाचे दिग्दर्शन ह्रषिकेश मुखर्जी यांचे आहे, एवढे सांगितले तरी पुरे. आणि प्रियकर (नवीन निश्चल) हे गाणे आपल्या प्रेयसीला (अर्चना)ला उद्देशून गात असतानाच पार्श्वभूमीवर सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीची मुंबई दिसतेय. विशेषत: माहिम-दादर-वरळी (कोळीवाडा) या परिसरात तेव्हा असणारी चाळ संस्कृती व कापड गिरण्यांची उंच चिमणी दिसते.

चाहे कहो इसे मेरी मोहब्बत, चाहे हँसी में उड़ा दो
ये क्या हुआ मुझे मुझको खबर नहीं, हो सके तुम ही बता दो

प्रियकर आपल्या प्रेमाची कबूली तर देतोय. पण त्याच प्रेमाने आपली कशी गत करुन टाकलीय याचीही कबूली देतोय. एकाच परिघात फिरत असले तरी गाण्यातून व्यक्त होणार्‍या प्रामाणिक भावना खूप महत्त्वाच्या आहेत. गीतकार मजरूह, संगीतकार राहुल देव बर्मन व पार्श्वगायक किशोरकुमार या त्रयीच्या अनेक सुपर हिट गाण्यातील हे एक.

यूँ तो हसीनों के, माहजबीनों के होते हैं रोज नज़ारे
पर उन्हें देख के देखा है जब तुम्हें, तुम लगे और भी प्यारे

आपल्या पाहण्यात तशा खूप युवती आहेत. पण तुझी त्याना सर नाही, हे प्रियकर छान शब्दात व्यक्त करतोय. नवीन निश्चलच्या वाट्याला विविध चित्रपटात बरीच आशयपूर्ण गाणी आली. पण ती खुलवायचे विशेष कष्ट त्याने घेतले नसले, तरी गाण्याचा गोडवा व सादरीकरण यांनी ही कसर भरून काढली.

रात कली एक ख्वाब में आई और गले का हार हुई
सुबह को जब हम नींद से जागे, आँख तुम ही से चार हुई

हे गाणेदेखिल अगदी तसेच…
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 22, 2017 1:05 am

Web Title: bollywood music hindi movie buddha mil gaya song raat kali ek khwab mein aayi
Next Stories
1 Bigg Boss 11: …तर चपलेने मारेन, या अभिनेत्याला अर्शी खानची धमकी
2 ‘मी २०० टक्के भन्साळींसोबत’
3 जॅकलीन फर्नांडीस आणि वरुण धवनचा पोल योगा पाहिलात का?
Just Now!
X