गाण्याचा मुखडा ऐकताच नक्की विविध प्रकारच्या गोष्टी अनेकांच्या मनात आल्या असणार. हिंदी चित्रपट गीत-संगीत रसिकांना गुलजार व राहुल देव बर्मन या जोडीचे संस्मरणीय गाणे म्हणून या गाण्याची आठवण आली असेल.

हिंदी चित्रपटातील वेगळ्या धाटणीच्या प्रेमगीतांचे शौकिन म्हणतील, किशोरकुमार व लता मंगेशकर यांच्या सर्वोत्तम प्रेमगीतातील हे एक आहे. त्यात एकमेकांच्या व्यक्तिमत्वातील नेमक्या सौंदर्य छटांची तारीफ करतानाच खट्याळपणाही आहे.

Netizens troll again Amruta Fadnavis for new song
“हे राम, वाचव आमचे कान…”, अमृता फडणवीसांचं नवं गाणं ऐकून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियेचा पाऊस, म्हणाले…
Govinda stopped the fleet of vehicles and bought shoe from small shop
गोविंदाला बुटाची भुरळ! रोड शो थांबवून खरेदी केले बूट; किंमत ऐकून तुम्ही म्हणाल…
Loksatta entertainment  Relive the memories of Geetramayana on the occasion of Swaragandharva Sudhir Phadke
‘स्वरगंधर्व सुधीर फडके’च्या निमित्ताने ‘गीतरामायणा’च्या आठवणींना उजाळा..
drama review of Himalayachi sawali
‘ती’च्या भोवती..! हिमालयाएवढी खंबीर!

तर रेखाचे निस्सीम चाहते म्हणतील, या गाण्यात खरं तर या ‘घर ‘ (१९७८) चित्रपटात रेखा सांसारिक रुपात साधी तरी खूपच सुंदर दिसलीय . तिच्यावर हे गाणे छानच चित्रीत झालयं. कधीही गुणगुणावे, पाहवे. तोच आनंद मिळतोय. पण इतके असूनही विनोद मेहराचीही आठवण यायला हवीच हो…

आप की आँखों में कुछ महके हुए से राज़ है
आपसे भी खूबसूरत आपके अंदाज़ हैं

पती (अर्थात विनोद मेहरा) आपल्या ‘घरा’च्या प्रशस्त गच्चीवर आपल्या पत्नीचे (रेखा) कौतुक करु लागताच ती कधी एक टक त्याच्याकडे बघते, तर कधी छान लाजते. नवऱ्याकडून होणारी ही तारीफ ती स्वीकारते म्हणूनच तर त्याची गीत प्रतिभा (अर्थात गुलजार यांची) जास्तच खुलते.

लब हिले तो मोगरे के फूल खिलते हैं कहीं
आप की आँखों में क्या साहिल भी मिलते हैं कहीं

गाण्यातील गोडवा त्याच्या चित्रीकरणातही उतरलाय याचे श्रेय दिग्दर्शक माणेक चॅटर्जी यांनाही आहेच. पण गॉसिप्सवाले अगदी वेगळ्याच दृष्टीने याकडे पाहतात. ‘ऐलान’ (१९७२) चित्रपटात एकत्र भूमिका करतानाच विनोद मेहरा व रेखा प्रेमात पडून त्यांनी लग्नदेखिल केले. पण कशावरून तरी बिनसले म्हणून ते वेगळे झाले व रेखाने शिळा उपमा खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आणि ते तात्कालिक मिडियासमोर देखील सांगितले. हे सगळेच विसरुन या चित्रपटात या दोघांनी एकमेकांवर बेहद्द प्रेम असणार्‍या पती-पत्नीची भूमिका साकारली हे विशेषच.

आप की बातों में फिर कोई शरारत तो नहीं
बेवजह तारिफ़ करना आप की आदत तो नहीं

आता ती आपल्या कौतुकाला त्याच भाषेत उत्तर देते. दरम्यान तो हलकीशी सिगारेट ओढत तिच्या चेहर्‍यावर धूर उडवतो. मग प्रशस्त बाथरूममध्ये दोघांत छेडछाड होते. त्यानंतर रात्रौ नवीन वस्त्रात दोघांची प्रेमळ मस्ती-छेडछाड सुरुच राहते. हसत खेळत गाणे रमते. ती गाता गाता त्याचे नाक पकडते. पती-पत्नीवरील हिंदी चित्रपट गीतातील हे एक खूप गोड गाणे आहे. एन.एन. सिप्पी निर्मित हा चित्रपट थीम, संगीत व अभिनय या तीनही बाबतीत सरस ठरलाय.