News Flash

शब्दांच्या पलिकडले : नीले गगन के तले…

या गाण्याचा रहस्याशी काही संबंध असेल का असाही प्रश्न मनात येतो.

राजकुमार आणि विमी

चित्रपटाची शीर्षके संपतानाच आपले लक्ष्य असते ते पहिले दृश्य कोणते असेल बरे… तेवढ्यात संगीताचे सूर कानावर पडतात व गाणे सुरु होते,

नीले गगन के तले धरती का प्यार पले
ऐसे ही जग में, आती हैं सुबहें, ऐसे ही शाम ढले

‘जानी’ राजकुमार व विमी घोड्यावर रपेट करताहेत व बॅकग्राऊंडला गाणे सुरु झालयं. बी. आर. फिल्म्सचे निर्माता-दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांच्या ‘हमराज’ (१९६७) चित्रपटातील हे गाणे आहे हे एव्हाना चित्रपट रसिकांनी ओळखले असेलचं. आपल्याकडे दूरदर्शन येण्यापूर्वीचा हा काळ. रेडिओ सिलोन व विविध भारतीवर ऐकून आवडलेले गाणे चित्रपटात कसे दिसतेय हे ‘पाहण्यास’ चित्रपटगृहाचीच वारी करावी लागे. आणि त्यात हे चित्रपटाच्या सुरुवातीलाच गाणे,

शबनम के मोती, फुलों पे बिखरें, दोनों की आस फले

महेंद्र कपूरच्या आवाजातील गाणे पुढे सरकताना राजकुमार व विमी सतत नवीन वस्त्रात दिसतात सोबतचं सिमला आणि काश्मीरच्या निसर्ग सौंदर्याचे प्रसन्न दर्शन घडते.

बलखाती बेलें, मस्ती में खेले, पेड़ों से मिलके गले

गाणे, निसर्ग सौंदर्य, राजकुमार व विमी यांचा प्रवास हे सगळे एकाच लयीत चाललयं. आता ते स्थानिक पिकनिक ट्रेनमध्ये आहेत. ते दररोज नवीन ठिकाणी भेटतात अशी ही सादरीकरणातील कल्पना आहे. ‘हमराज’ रहस्य रंजक असल्याचे अगोदर माहित असल्याने तर या गाण्याचा रहस्याशी काही संबंध असेल काय असाही एक प्रश्न उगाच येऊन जातो.

नदिया का पानी, दरिया से मिलके, सागर की ओर चले

आता नदी-नाला, फुलांचा पाळणा असे सौंदर्य खुलते. राजकुमार मात्र अगदी रुबाबात विविध प्रकारच्या कपड्यात छान खुलतोय. त्याचे राजबिंड व्यक्तिमत्व त्यामुळे अधिकच खुललयं. साहिरच्या गीताना रविचे संगीत हे तर ‘बी. आर. फिल्म्स’च्या चित्रपटांचे वैशिष्ट्य होतेच. ही सगळी टीमच जमली होती.

नीले गगन के तले…

गाणे शेवटाकडे जाताना राजकुमार व विमीची प्रतिमा धुसर होत जाते. पण गाणे मात्र लक्षात राहिलेले असते.
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 2:05 am

Web Title: bollywood music hindi movie humraaz song nile gagan ke tale
Next Stories
1 …म्हणून महिमाची बॉलिवूडमधून ‘एक्झिट’
2 माहिरा खान आणि तिची आई झाली ‘ऑटो करेक्ट’ची शिकार
3 शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते ‘फर्जंद’ पोस्टरचे अनावरण
Just Now!
X