News Flash

शब्दांच्या पलिकडले : मुसाफिर हू यारो…

मिशीधारी जीतेंद्र हे वेगळेपण.

jeetendra
जीतेंद्र (सौजन्य - यूट्युब)

आपल्या चित्रपटातील अनेक प्रकारच्या वाहनांवरील गाण्यांचा खजिना केवढा तरी. अगदी त्या वाहनाच्याही ‘चाली’चा वेध व वेग त्यात पकडण्याचे कौशल्य साधल्याचे जाणवते…

मुसाफिर हू यारो
ना घर है
ना ठिकाना…
मुझे चलके जाना है

पटकन तुमच्या डोळ्यासमोर टांगा अथवा घोडागाडीतील जीतेंद्र आला असेलच. टांगा गाडी व त्याचा घोडा या दोघांच्याही धावण्याचा आवाज व वेग गाण्यात पकडण्याचे कौशल्य व कसब साधणे एक कलाच आहे. त्यात हे ‘परिचय’ (१९७२) चित्रपटातील गाणे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शन गुलजार यांचे असल्याने त्यांच्या चित्रपटातील गाणी तद्दन फिल्मी नक्कीच नसणार हे स्वाभाविक. ते मुळचे कवि-गीतकार. त्यामुळे या ( व त्यांनी दिग्दर्शिलेल्या अनेक) चित्रपटातील गाणी त्यांचीच. संगीतकार राहुल देव बर्मनशी गुलजार यांची जोडी जमणारी, तर किशोरकुमार या दोघांच्या चित्रपटात नेहमीच खुललाय. मिशीधारी जीतेंद्र हे मात्र वेगळेपण. तेव्हाच्या आपल्या ‘जंपिंग जॅक’ इमेजपेक्षा त्याला काही वेगळे करायचे होते. आणि ‘परिचय’च्या रुपाने त्याला खूपच चांगली संधी मिळाली…

एक राह रुक गई
तो और जुड गई
मै मुडा तो साथ साथ
राह मुड गई….

टांगा अथवा घोडागाडी छान चाललीय आणि गाण्याचा मूडही छान सापडलाय. तो काहीसा स्वच्छंदी आहे तितकाच तो काहीसा तात्विक देखिल आहे. रानावनातून रस्ताही मोकळा व छान सापडलाय. प्रवासाचा आनंद कसलीच दमछाक करत नसल्याचा प्रत्यय त्यात येतोय. जीतेंद्र अभिनयासाठी ओळखला जात नसूनही यात मात्र तो उत्तम एक्स्प्रेशन देतो…

दिन मे हाथ थामकर
इधर बिठा लिया
रात मे इशारोसे
इधर बुला लिया…

जीतेन्द्र शिक्षक असून एका वात्रट मुलांच्या कुटुंबात तो निघालाय. टांग्यातील प्रवास पूर्ण होताच तो पायी निघतो. एव्हाना गाणे फार रंगात आलेले असते. हाता-खांद्यावरील सामान सांभाळत जीतेंद्र गातोय हे खूपच दुर्मिळ दृश्य. म्हणूनच तर महत्त्वाचे.

मुसाफिर हू यारो
ना घर है ना ठिकाना
मुझे चलके जाना है..

जीतेंद्र इच्छित स्थळी पोहचल्यावर गाण्याचा वेग आपोआपच मंदावतो. आपण देखिल त्याच गाण्यासह कधी बरे टांग्यातून प्रवास केला याची आपल्याला तरी कल्पना कुठे येते हेच तर या गाण्याचे विशेष होय.
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2017 11:49 am

Web Title: bollywood music hindi movie parichay song musafir hoon yaaron
Next Stories
1 ‘या’ कार्यक्रमामुळे कमल हसन यांच्यावर मानहानीचा खटला दाखल
2 कथा पडद्यामागचीः रंगभूमीमुळे मला नोकरी मिळाली- विजय पाटकर
3 वरुण- नताशाचं नातं होणार ‘ऑफिशिअल’
Just Now!
X