मनोजकुमारच्या दिग्दर्शनातील चित्रपटामधील फिल्मी देशप्रेमाबद्दल कायमच उलटसुलट चर्चा होत असली तरी त्याच्या गीत-संगीत-नृत्याच्या चित्रीकरणाला दाद द्यायलाच हवी अशी त्याच्या चित्रपटातील अनेक गाणी आहेत. असेच हेदेखील,

कोई जब तुम्हारा ह्रदय तोड़ दे
तड़पता हुआ जब कोई छोड़ दे
तब तुम मेरे पास आना प्रिये
मेरा दर खुला है, खुला ही रहेगा, तुम्हारे लिए

bollywood celebrity charge money for attending funeral
“बॉलीवूड सेलिब्रिटी अंत्यसंस्काराला जायचे पैसे घेतात,” प्रसिद्ध अभिनेत्याचा मोठा दावा; म्हणाला, “तेराव्याला जाण्याचे…”
Loksatta lokjagar discussion temperament through Defamation character
लोकजागर: चारित्र्यावर चर्चा का?
18 Months Later Shukraditya Rajyog in Mesh
दीड वर्षांनी शुक्रादित्य योग बनल्याने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसे व प्रेम; २४ एप्रिलपासून जगण्याला मिळेल नवं वळण
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

मनोजकुमारने ‘उपकार’च्या यशानंतर ‘पूरब और पश्चिम’ (१९७०) या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले. थीमनुसार या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण इंग्लंडमधील आहे आणि हे विरह अथवा विव्हळ गीतही तेथीलच भव्य पॅलेसच्या आवारातील तशाच विस्तीर्ण आणि देखण्या गार्डनमध्ये आहे. भारत (अर्थातच मनोजकुमार) आपल्याला दुखावून निघालेल्या इंग्लंडस्थित प्रीतीला (सायरा बानू) उद्देशून हे गाणे गातोय…

अभी तुमको मेरी ज़रूरत नहीं
बहोत चाहनेवाले मिल जायेंगे
अभी रूप का एक सागर हो तुम
कंवल जितने चाहोगी खिल जायेंगे
दर्पन तुम्हे जब डराने लगे
जवानी भी दामन छुड़ाने लगे
तब तुम मेरे पास आना प्रिये
मेरा सर झुका है, झुका ही रहेगा, तुम्हारे लिए

मुकेश दर्दभरी गाणी अतिशय उत्कटतेने गाण्यासाठी जास्त ओळखला जाई. येथेही इंदिवरच्या या गीतामधील भाव नेमका पकडलाय. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांनीही प्रसंगाचे मर्म ओळखून धीम्या चालीत हे गाणे साकारलेय. हातातील फाईल घट्ट पकडत भारत आपले भाव व्यक्त करीत असतानाच इंग्रजाळलेल्या रुपातील प्रीती त्याच्यापासून काही अंतरावरून चालतेय. विस्तीर्ण गार्डनवर हे दोघेच असल्याने तर हे गाणे अधिकच गडद वाटतेय.

कोई शर्त होती नहीं प्यार में
मगर प्यार शर्तों पे तुमने किया
नज़र में सितारे जो चमके ज़रा
बुझाने लगी आरती का दिया
जब अपनी नज़र में ही गिरने लगो
अंधेरो में अपने ही घिरने लगो
तब तुम मेरे पास आना प्रिये
ये दीपक जला है, जला ही रहेगा तुम्हारे लिए

नायक आपल्या उत्कट प्रेमाची विविध प्रकारे अनुभुती देतोय. पण त्याच्या प्रेयसीवर मात्र याचा कसलाही परिणाम होत नाही. तो तरीही अगदी शांतपणे आपली भावना व्यक्त करतोय. मुकेशच्या काही क्लासिक गाण्यांत या गीताचा समावेश होतोच पण मनोजकुमारला संगीताचा चांगला कान असल्याचाही या गाण्यात प्रत्यय येतो. त्याचे ते खूपच मोठे दिग्दर्शनीय वैशिष्ट्य आहे.
दिलीप ठाकूर