08 March 2021

News Flash

शब्दांच्या पलीकडले : आजा रे आजा रे मेरे दिलबर आजा…

गाण्याच्या शेवटच्या कडव्यात ते दोघे एकमेकांसमोर आणि मग एकमेकांच्या जवळ येतात.

आजा रे आजा रे मेरे दिलबर आजा...

आजा रे आजा रे मेरे दिलबर आजा…
ओ नूरी…

प्रेमाची ही हाक लगोलग काश्मिरच्या गावात घेऊन जाते आणि निरागस भाव व्यक्त करणार्‍या प्रेमगीताची आठवण देते.

आजा रे आजा रे मेरे
दिलबर आजा
दिल की प्यास बुझा जा रे…

प्रियकराला (फारूख शेख) प्रेयसीची (पूनम धिल्लो) आठवण येते आणि या उत्कट प्रेमगीताला सुरुवात होते. हे दोघे याक्षणी एकमेकांपासून दूर आहेत पण त्यांची एकमेकांना प्रेमाची साद आहे. म्हणूनच तर दोघानाही प्रेमाचा स्वर आणि सूर सापडलाय.

उजला उजला नर्म सवेरा
रुह मे मेरी झाके….

वाचा : न्यासामुळे अजयला घ्याव्या लागताहेत झोपेच्या गोळ्या

काश्मीरच्या खेड्यात उमलणाऱ्या या प्रेमात उर्दू शब्दांचा समावेश अगदी स्वाभाविक ठरलाय. (गीतकार जां निसार अख्तर) आणि हेच प्रेम फुलतानाच काश्मीरमधील ग्रामीण जीवनाचेही दर्शन घडत जाते. फारुख शेख व पूनमच्या वस्त्रांपासूनच त्याची सुरुवात होते. विशेषत: पूनम वेताचे बास्केट गळ्यात अडकवून पाणी भरायला जाते आणि मग एका नाल्यावर छोट्याशा मडक्यात पाणी भरतानाही गाणे म्हणते हे तर विशेषच.

दर्द जगाए मिठा मिठा
अरमा जागे जागे..

यशराज फिल्म्सच्या ‘नूरी’चे (१९७९) हे प्रेमगीत संगीतामधून (संगीत खय्याम) अधिकच हळूवार ठरलंय. कारण त्यात मोजक्याच वाद्यांचा वापर केलाय. गाण्याच्या प्रसंगाचे नेमके भान ठेवलंय, असे म्हणावे लागेल. नकळत काश्मिरमधील घरे/ रस्ते/ राहणीमान/ मेंढ्या इत्यादींचेही गाण्यात दर्शन घडते. दिग्दर्शक मनमोहन कृष्ण यांचे हे कौशल्य म्हणूया. ते जुन्या चित्रपटातील चरित्र नायक. त्याना निर्माते यश चोप्रानी ‘नूरी’च्या दिग्दर्शनाची संधी दिली. चित्रपटाला उत्तम यशही मिळाले. पण मनमोहन कृष्ण यांचा हा एकमेव दिग्दर्शनीय चित्रपट.

दूर नही तुझसे साथी
एक नजर तुझको देखू
जागे किस्मत मेरी…

वाचा : ‘या’ चित्रपटात प्रियांका साकारणार आमिरच्या पत्नीची भूमिका

गाण्याच्या शेवटच्या कडव्यात ते दोघे एकमेकांसमोर आणि मग एकमेकांच्या जवळ येतात. तोपर्यंत एकमेकांना दिलेली प्रेमाची हाक वा आवाज अधिकच उत्स्फूर्त झालेला असतो. लता मंगेशकर आणि नितीन मुकेश यांनी हे प्रेमगीत गायलंय. ‘ओ… नूरी’ हे गाताना नितीन मुकेशने आवश्यक आवाजही चढवलाय. त्यामुळेच तर गाण्यात प्रेम रंग भरलाय. साठ-सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटातून मोठ्या प्रमाणात काश्मीरचे सौंदर्य खुललंय. अशा काही प्रेम गीतात तर ते छोट्या छोट्या तपशीलासह रंगलंय. हे गाणे त्यासह आठवते हे विशेष उल्लेखनीय!

ओ……. नूरी
– दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 5, 2017 3:35 am

Web Title: bollywood music noorie 1979 movie song aaja re o mere dilbar aaja
Next Stories
1 कंगनाला ‘शट-अप’ म्हणताच नेटीझन्सनी करणला केलं ट्रोल
2 ‘कंगनाची मुलाखत म्हणजे जणू ‘सर्कस’च!’
3 या अभिनेत्रीमुळे हृतिक- कंगनाचे झाले होते ब्रेकअप
Just Now!
X