29 September 2020

News Flash

लग्नानंतरही साराला राहायचंय ‘या’ व्यक्तीसोबत

लग्नानंतर असा असेल साराचा फ्युचर प्लान

सारा अली खान

कलाविश्वाला सारा अली खान हे नाव आता काही नवीन राहिलं नाही. केदारनाथ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या साराने आता स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच आता ती चित्रपटांव्यतिरिक्त अनेक मासिकांच्या कव्हर फोटो, जाहिराती यांमध्ये झळकताना दिसते. तसंच अनेक वेळा ती मुलाखतींमध्येही पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वीच साराने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आणि करिअरविषयी खास गप्पा मारल्या. विशेष म्हणजे साराला लग्नानंतर नवऱ्यासोबत राहण्यापेक्षा एका खास व्यक्तीसोबत रहायला आवडेल असंदेखील तिने सांगितलं.

साराने ‘Bazaar India’ या मॅगझीनला मुलाखत दिली. त्यात तिने तिच्या लग्नाच्या प्लानविषयी काही गोष्टींचा खुलासा केला. “लग्नानंतर सुद्धा मला माझ्या आईसोबत अमृता सिंगसोबत रहायला आवडेल. माझ्या आईने माझ्या लग्नासाठी अनेक गोष्टी आधीपासूनच ठरविल्या आहेत. त्यामुळे जेव्हा मी सांगते की, लग्नानंतर सुद्धा मला तुझ्याच सोबत रहायचं आहे . तेव्हा ती प्रचंड वैतागते. लग्नानंतर ती माझ्यासोबत येऊ शकते. यात कोणती समस्या आहे ? मला तिच्यासोबत कायम वेळ घालवायला आवडतो. ती काही दिवसांसाठी जरी माझ्यापासून दूर गेली तरी मला अस्वस्थ व्हायला होतं”, असं साराने या मुलाखतीत सांगितलं.

 

View this post on Instagram

 

“I intend to live with my mother for the rest of my life. She gets upset when I say that because she has this whole marriage plan for me, but she can also come with me no, what’s the problem? I love hanging out with her, and I miss her when she’s away even for a few days,” says @saraalikhan95, our cover star this month. Editor: Nonita Kalra (@nonitakalra) Creative director: Yurreipem Arthur (@yurreipemarthur) Fashion director: Edward Lalrempuia (@edwardlalrempuia) Text by: Esha Mahajan (@esha.mahajan) Photographer: Signe Vilstrup (@signe_vilstrup) Hair: Florian Hurel (@florianhurel) at Artist Factory India (@artistfactoryindia) Make up: Anil Chinnappa Dress: Sahil Kocchar (@sahilkochar) Earrings and ring: Anita Dongre (@anitadongre) Photographers agency: Anima Creative Management (@animacreatives) Production: Parul Menezes(@parulmenezes) Fashion Assistant: Smridhi Sibal (@smridhisibal) Location courtesy: Soho House, Mumbai (@sohohousemumbai) #SaraAlikhan #bazaarindia #juneissue

A post shared by Harper’s Bazaar, India (@bazaarindia) on

गेल्या काही दिवसांपासून कलाविश्वामध्ये सारा आणि कार्तिक आर्यन यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहेत. अनेक वेळा या दोघांना एकत्र स्पॉटदेखील करण्यात येतं.

दरम्यान, सारा लवकरच चित्रपट दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या चित्रपटामध्ये झळकणार आहे. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यनच तिच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. हा चित्रपट ‘लव आज कल’ या चित्रपटाचा सीक्वल असल्याचं सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 6, 2019 12:21 pm

Web Title: bollywood news sara ali khan live with her mother amrita singh even after marriage ssj
Next Stories
1 अक्षय कुमारच्या ‘रावडी राठोड’चा सिक्वल ?
2 सुनील ग्रोवर तैमूर बद्दल म्हणतो…
3 ‘वयाने मोठा पुरुष साथीदार चालतो मग स्त्री का नाही?’, प्रियांकाचा सवाल
Just Now!
X