27 May 2020

News Flash

बॉलिवूडमध्ये आणखी एक करोनाग्रस्त, दोन्ही मुलींनंतर निर्मात्याचीही करोना चाचणी पॉझिटीव्ह

या निर्मात्याने ‘चेन्नई एक्स्प्रेस’, ‘दिलवाले’, ‘हॅपी न्यू इअर’ आणि ‘रा वन’ या चित्रपटांची निर्मिती केली आहे

काही दिवसांपूर्वी ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटाचे निर्माते करिम मोरानी यांच्या मुली अभिनेत्री झोया मोरानी आणि शाजा मोरानी यांना करोना झाल्याचे समोर आले. त्यानंतर करिम यांच्या संपूर्ण कुटुंबीयांची करोना चाचणी करण्यात आली. आता मुलींपाठोपाठ करिम यांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे.

नुकताच करिम यांचा भाऊ मोहम्मद यांनी ‘बॉम्बे टाइम्स’शी बोलताना करिमची करोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे. ‘हो करिमची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पण त्याची पत्नी आणि इतर काम करणाऱ्या लोकांच्या चाचणीचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत’ असे मोहम्मद यांनी म्हटले आहे. करिम राहत असलेली संपूर्ण इमारत प्रशासनाने सॅनिटाइज केली आहे.

करिम यांचे वय ६० वर्षे आहे आणि ते हार्ट पेशंट असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना काळजी वाटत आहे. करिम यांच्या दोन्ही मुलींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाजा श्रीलंकाहून परतली होती. मात्र तिच्यात करोनाची कोणतीच लक्षणे दिसून आली नव्हती. तर झोया मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात राजस्थानहून परतली होती. आता शाजा नानावटी रुग्णालयात दाखल असून झोयाला कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

लॉकडाउन लागू होऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत. या काळात महाराष्ट्रासह देशातील करोनाग्रस्त रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढली आहे. गर्दी कमी झाली असली, तरी संसर्ग होण्याचा वेग कमी झालेला दिसत नाही. त्यामुळे महाराष्ट्रासह काही राज्यातील लॉकडाउन लांबणार असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषत: मुंबई, पुणे, ठाणे, पिंपरी-चिंचवड या शहरांसह राज्यातील करोनाग्रस्त जिल्ह्यातील लॉकडाउन कायम ठेवण्याच्या दिशेने सरकार विचार करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 6:27 pm

Web Title: bollywood producer karim morani tested positive for covid 19 avb 95
Next Stories
1 करोनाने घेतला आणखी एका कलाकाराचा बळी; उपचारादरम्यान झाला मृत्यू
2 लॉकडाउनमध्ये दारु न मिळाल्याने अभिनेत्रीच्या मुलाने घेतल्या झोपेच्या गोळ्या ?
3 मालिकेतील वादग्रस्त कथानकामुळे उजळलं अभिनेत्रीचं नशीब
Just Now!
X