अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टींचा मुलभूत गरजा म्हणून उल्लेख केला जातो. पण, त्यात आणखी एक गोष्टही समाविष्ट केली गेली पाहिजे, असेच अनेकांचे म्हणणे आहे. मुळात मुलभूत गरजांच्या या विभागात अशा आणखी काही गरजासुद्धा आहेत, ज्यांच्याशिवाय अनेकांनाच चुकल्यासारखे वाटते. त्यापैकीच एक म्हणजे मोबाईल. २४ तासांमधील जास्तीत जास्त वेळ तुम्ही कोणासोबत व्यतीत करता, असे विचारल्यास अनेकांचेच उत्तर ‘मोबाईलसोबत’, असे असते. अभिनेत्री प्रियांका चोप्राही त्यापैकीच एक. सोशल मीडियावर असणारी प्रियांका मोबाईलचा फार वापर करते खरी. पण, वारंवार येणारे ई-मेल, मेसेज या साऱ्याला उत्तरं देण्याचे प्रियांकाही मनावर घेत नाही.

‘ग्लोबल स्टार’ म्हणून नावारुपास आलेली ही अभिनेत्री तिला केल्या जाणाऱ्या बऱ्याच ई-मेलची उत्तरं देतच नाही. पण, ती ते मेल वाचण्याचे कष्टही घेत नाही. ‘क्वांटिको गर्ल’ची लोकप्रियता पाहता तिला येणाऱ्या मेल आणि मेसेजचा आकडा जास्त असणार हे नाकारता येणार नाही. अभिनेता अॅलन पॉवेलने सोशल मीडियावर प्रियांकाच्या मोबाईल स्क्रीनचा एक फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये तिने २ लाख ५७ हजार ६२३ मेल न वाचल्याचे स्पष्ट होतेय. अॅलनने एक ट्विट करत लिहिले, ‘लोकहो…. ऐका, प्रियांका चोप्राला कधीच ई-मेल करु नका, कारण ती ते कधी वाचतच नाही’.

वाचा : ब्रिटनच्या शाही विवाहातल्या काही जगावेगळ्या पद्धती तुम्हाला माहितीये?

https://www.instagram.com/p/BcVyKASn4WD/

अॅलनने हा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच अनेकांनी या फोटोशी स्वत:चा संदर्भ जोडण्याचा प्रयत्न केला. सतत येणारे ई-मेल आणि मेसेजेस बऱ्याचदा आम्हीही वाचत नाही असेच अनेकांनी स्पष्ट केले. अॅलेनच्या ट्विटला उत्तर देणाऱ्यांमध्ये प्रियाकाच्या चाहत्यांचा सहभाग जास्त असल्याचे पाहायला मिळाले असून, सोशल मीडियावर न वाचलेल्या ई-मेलचा हा किस्सा बराच गाजला.