आगीच्या ज्वाळांचा दाह आणि त्यांच्याकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन देणारे काही कोट्स पाहिल्यावर तुमच्याही लक्षात येईल की तुम्ही बॉलिवूड ‘क्वीन’च्या घरात उभे आहात. कंगना रणौत ही एक अशी बॉलिवूड अभिनेत्री आहे जिने कधीच तिची मतं दडवून ठेवली नाहीत. याउलट ती नेहमीच ठाम भूमिका मांडण्यासाठी चर्चेत राहिली. कोणत्याही बड्या नावाच्या आधाराशिवाय कंगनाने हिंदी चित्रपटसृष्टीत तिचं स्थान भक्कम केलं असून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. अशा या अभिनेत्रीचं घर कसं असेल हाच प्रश्न तुम्हालाही पडतोय ना?

कंगनाने नुकताच तिच्या घराचा कायापालट केला आहे. ‘क्वीन’ चित्रपटाचे दिग्दर्शक विकास बहलची पत्नी रिचा बहलने तिच्या घराचं इंटेरियर डिझायनिंग केलं आहे. मुख्य म्हणजे तिच्या घरातील प्रत्येक खोलीचीसुद्धा स्वत:ची अशी एक ओळख असून ती कंगनाशी निगडीत आहे. कंगना जवळपास तीन वर्षांपासून खार येथील एका प्रशस्त फ्लॅटमध्ये राहात आहे. तिचं हे घर एखाद्चा राजमहालापेक्षा कमी नाही असंच म्हणावं लागेल, हो.. पण हा राजमहाल ‘क्वीन’ कंगनाच्या स्वभावानुसार आणि तिच्या आवडीनिवडींनुसारच डिझाईन करण्यात आला आहे.

कंगना मूळची हिमाचल प्रदेशची असल्यामुळे त्याची झलक तिच्या या घरात पाहायला मिळते. रिचाने कंगनाच्या घराचं डिझायनिंग केलं असलं तरीही त्यासाठी सर्व संकल्पना कंगनाच्याच आहेत ही लक्षात घेण्याजोगी बाब आहे.

लिव्हिंग रुम– कंगनाचा लिव्हिंग रुम हा एखाद्या वस्तुसंग्रहालयाप्रमाणे दिसत आहे. या रुममध्ये कंगनाने संग्रही ठेवलेल्या काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. मुख्य म्हणजे हॉलिवूड अभिनेत्री मर्लिन मोन्रोचा फोटो या रुममध्ये लक्ष वेधत आहे. मर्लिनप्रमाणेच कंगनाही स्वत:च्या मर्जीने आयुष्य जगण्याला प्राधान्य देते. कंगनाच्या घरात ब्रिटीश आणि हिमाचल प्रदेशातील घरांची सुरेख सांगड घातल्याचं पाहायला मिळतंय.
kangana-ranaut-2

kangana-ranaut-3

वर्क स्टेशन- कामाप्रती असणारी कंगनाची एकनिष्ठता आणि ओढ तिच्या वर्कस्टेशनमध्ये झळकतेय. एक कलासक्त कलाकार असलेल्या कंगनाच्या आवडीनिवडी या खोलीत आपण पाहू शकता.
kangana-ranaut-1
बेड रुम- कंगनाचा बेडरुम हा अतिशय सुरेख असून त्यामध्ये सौम्य रंग वापरण्यात आले आहेत. कंगनाने इंटेरियर डिझायनरच्या साथीने तिच्या घराचा केलेला हा कायापालट तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरुर कळवा.
kangana-ranaut-5
kangana-ranaut-8

kangana-ranaut-9