21 September 2020

News Flash

आर.के स्टुडिओच्या विक्रीसाठी कपूर कुटुंबीय करतेय ‘या’ कंपनीशी चर्चा

दिवाळीनंतर या स्टुडिओच्या विक्रीसंदर्भातील कागदपत्र रजिस्टर होणार आहेत.

बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार हा स्टुडिओ आहे.

आर. के. स्टुडिओ आणि बॉलिवूडचं नातं खूप जुनं आणि खास आहे. बॉलिवूडच्या सुवर्णकाळाचा साक्षीदार असलेल्या या स्टुडिओने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. जवळपास ७० वर्षांहून अधिक काळ मुंबईतील चेंबूर येथे उभ्या असलेला या स्टुडिओचा ताबा लवकरच नव्या मालकाकडे जाणार आहे.

‘पिंकव्हिला’नुसार, स्टुडिओतून मिळणारं उत्पन्न हे फारच कमी असल्यामुळे त्याच्या देखभालीचा खर्च परवडत नसल्यामुळे कपूर कुटुंबियांनी हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कपूर कुटुंबीय गोदरेज प्रॉपर्टीजशी चर्चा करत असून हा स्टुडिओ गोदरेज प्रॉपर्टीज विकत घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

आरके स्टुडिओचा मालकी हक्क संस्थापक ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्याकडे असून दिवाळीनंतर या स्टुडिओच्या विक्रीसंदर्भातील कागदपत्र रजिस्टर होणार आहेत.

दरम्यान, या स्टुडिओच्या जवळच्या परिसरातील सव्वा दोन एकर जागाही गोदरेज प्रॉपर्टीने १७५ कोटी रुपयांना विकत घेतल्याचं सांगण्यात येत आहे. तसंच दिवंगत अभिनेते राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा राज कपूर, मुलं रणधीर, ऋषी आणि राजीव आणि मुलगी रितू नंदा आणि रिमा जैन यांनी एकमताने स्टुडिओ विकण्याचा निर्णय घेतला असून स्टुडिओची विक्री झाल्यानंतर त्यातून येणारा नफा स्टुडिओशी संबधीत प्रत्येकाला देण्यात येणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 12:09 pm

Web Title: bollywood r k studio buy by godrej properties
Next Stories
1 ‘बॉईज २’ च्या यशानंतर ‘बॉईज ३’ ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2 ‘व्हॅनिला स्ट्रोबेरी अॅण्ड चॉकलेट’मध्ये रवी काळे यांचा नवा अंदाज
3 लगीनघाई, ‘या’ वर्षामध्ये प्रभास बोहल्यावर चढणार ?
Just Now!
X