26 November 2020

News Flash

बिग बी, अजयच्या ‘मेडे’मध्ये रकुल प्रीतची वर्णी; साकारणार ‘ही’ भूमिका

रकुल प्रीत साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका

‘मेजर साहब’, ‘खाकी’ किंवा ‘सत्याग्रह’ हे चित्रपट साऱ्यांच्याच लक्षात असतील. या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभ बच्चन आणि अजय देवगण हे दोन दिग्गज कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्यानंतर आता ७ वर्षानंतर मेडे या चित्रपटात ही जोडी दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बिग व अजयसोबत अभिनेत्री रकुल प्रीतदेखील महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट व इन्स्टा पोस्ट करत रकुल प्रीत ‘मेडे’ या आगामी चित्रपटात झळकणार असल्याचं सांगितलं आहे. या चित्रपटात रकुल एक महिला वैमानिकाची भूमिका साकारणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Taran Adarsh (@taranadarsh)

आपल्या अभिनयाची प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा अजय ‘मेडे’ या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार असून तो या चित्रपटात मुख्य भूमिकादेखील साकारणार आहे. त्याच्यासोबतच बिग बी देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. डिसेंबरमध्ये या चित्रपटाचं हैदराबादमध्ये चित्रीकरण करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2020 12:33 pm

Web Title: bollywood rakul preet singh joins amitabh bachchan and ajay devgn thriller drama film mayday ssj 93
Next Stories
1 बिग बी-नागराज यांच्या ‘झुंड’चे प्रदर्शन अडचणीत; सर्वोच्च न्यायालयानेच घातली बंदी
2 मिलिंद सोमण पाठोपाठ अ‍ॅमी जॅक्सनने केलं न्यूड फोटोशूट
3 जिजाच्या बाललीला पाहून तुमचंही हरपेल भान; पाहा ‘हा’ गोड व्हिडीओ
Just Now!
X