News Flash

रणवीरने दिल्या अजिंक्य रहाणेला शुभेच्छा; मैदानात सिम्बासोबत अजिंक्यची फटकेबाजी

IPL साठी दिल्या शुभेच्छा

(photo-instagram@ranveersing/ajinkyarahane)

9 एप्रिल म्हणजेच उद्यापासून आयपीएलच्या सामन्यांना  सुरूवात होत असल्याने देशभरातील क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहचला आहे. IPLच्या मैदानात उतरण्यासाठी एककडे खेळाडू सज्ज आहेत तर दुसरीकडे क्रिकेटप्रेमी आपल्या आवडत्या टीमला आणि खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी आतूर आहेत. यातच क्रिकेटची आवड असलेले बॉलिवूड सेलिब्रिटी देखील मागे राहिलेले नाही. आवड्या टीमला आणि खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी सेलिब्रिटी कायमच मैदानात हजर असल्याचं पाहायला मिळतं.

बॉलिवूडचा सिम्बा म्हणजेच रणवीर सिंहने देखील दिल्ली टीमचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणेसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. रणवीर सिंहने क्रिकेटच्या मैदानातील अजिंक्यसोबत एक फोटो शेअर केला आहे. यात रणवीरने लाल रंगाचं जॅकेट परिधान केलं आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तो म्हणाला आहे, ” ऑल द बेस्ट फॉर द टुर्नामेन्ट चॅम्प” असं म्हणत त्याने अजिंक्यला 2021 च्या इंडियन प्रिमिअर लीगसाठी शुभेच्छा दिल्या आहे. तर अजिंक्यने देखील रणवीरचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranveer Singh (@ranveersingh)

रणवीरने हा फोटो शेअर करताच रणवीर आणि अजिंक्यच्या चाहत्यांनी दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसचं या फोटोला मोठी पसंती दिली आहे. तर अजिंक्य रहाणेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर रणवीरसोबतच एक व्हिडीओ शेअर केला आहे. ” जब सिम्बा आया मेरी गली मे तो एक क्रिकेट शॉट तो बनता है” असं कॅप्शन अजिंक्यने या व्हिडीओला दिलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajinkya Rahane (@ajinkyarahane)

एखाद्या क्रिकेटरच कौतुक करत त्याला शुभेच्छा देण्याची ही रणवीरच पहिलीच वेळ नाही. जेव्हा एखादा क्रिकेटर मैदानात उत्तम कामगिरी करतो तेव्हा रणवीर त्याचं कौतुक करताना दिसतो.
येत्या काळात रणवीर रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ या सिनेमात झळकणार आहे. तसचं त्याचा ’83’ या सिनेमात मुख्य भूमिका साकारताना दिसेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2021 4:07 pm

Web Title: bollywood ranveer singh wish ajinkya rahane good luck for ipl share photo kpw 89
Next Stories
1 बायकोला सरप्राइज द्यायला गेला अन् गायकाला झाली घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक
2 हिंदी मीडियम आणि खेड्यातील असल्याने बॉलिवूडमध्ये संघर्ष; पंकज त्रिपाठींचा खुलासा
3 ‘ब्रोकन ब़ट ब्युटिफूल ३’: सिद्धार्थ शुक्ला आणि सोनिया राठीच्या किसिंगचा व्हिडिओ व्हायरल
Just Now!
X