News Flash

‘साहो’ चित्रपटाचा दिग्दर्शक सुजीत अडकला लग्न बंधनात

पाहा फोटो

दाक्षिणात्य सुपरस्टार निखिल सिद्धार्थनंतर आता तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्दर्शकाने लग्न केले आहे. सुपरस्टार प्रभासच्या ‘साहो’ चित्रपटाचे दिग्दर्शन करणाऱ्या सुजीत रेड्डीने नुकताच लग्न केले आहे. हा लग्न सोहळा काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे. त्याच्या विवाह सोहळ्यामधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

गेल्या महिन्यात १० जून रोजी सुजीत रेड्डी आणि प्रवालिका यांनी साखपूडा केला होता. तेव्हा त्यांचे फोटो सोशल मीडियावर झाले असून चाहत्यांमध्ये त्यांच्या लग्नाबाबत उत्सुकता होती. प्रवालिका एक डेंटिस्ट आहे. ते दोघे गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांचा साखरपूडा हैदराबादमधील एका हॉटेलमध्ये झाला होता. तसेच लग्न सोहळा हा शहरापासून लांब असलेल्या एका रिसॉर्टवर आयोजीत करण्यात आला होता.

सुजीतने वयाच्या २३व्या वर्षी दिग्दर्शक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याने ‘रन राजा रन’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले. हा कॉमेडी थ्रिलर चित्रपट हिट झाला होता. त्यानंतर त्याने ‘साहो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. या चित्रपटात प्रभास, श्रद्धा कपूर, जॅकी श्रॉफ, नील नितिन मुकेश, अरुण विजय, चंकी पांडे, टीनू आनंद हे कालाकार दिसले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 3:21 pm

Web Title: bollywood saaho director sujeeth reddy gets married avb 95
Next Stories
1 मध्यरात्री शर्टलेस फोटो शेअर करत विकीने व्यक्त केली ही’ इच्छा
2 सोनू सूदच्या साथीदाराला पोलिसांनी मारली होती थोबाडीत; कारण…
3 “फक्त घराणेशाहीमुळे माझं २१ वर्षांचं करिअर घडलं नसतं”; करीनाचं ट्रोलर्सना उत्तर
Just Now!
X